नवीन लेखन...

स्वतःला बदलायच आहे? टी. क्यू. एम. वापरा!!!

Want to have a Change in yourself? Use TQM

स्वतःला कशाला बदलायच? आपण तर ‘बेस्ट’ असतो!!! बाकीचे गाढव असतात. हे अगदी खरं आहे. पण ‘हाय ये जमाना!’ हा देश, हा समाज, हे नातेवाइक, शेजारी ; खरं सगळच बदलायला हवं आहे. कोण बदलणार? हे काम मोठया लोकांचे. म्हणुन आपल्यालाच बदलायला हवं. आणि तेही आपणच!! पण कसे बदलणार? टी. क्यू. एम. वापरुन….

टी. क्यू. एम. म्हणजे ‘टोटल क्वालीटी मॅनेजमेन्ट’. जपानी विचार करण्याची पद्धत. ह्या पद्धतीमुळे जपानी क्वालीटी सगळया जगात सर्वोत्तम झाली. आपल्याकडेसुदधा बर्याच कंपन्या टी. क्यू. एम. वापरतात.

टी. क्यू. एम. मध्ये बर्याच गोष्टी समाविष्ट होतात. जसे ५ एसः (सेपरेट, सॉट, शाइन, सिस्टमटाइज, स्टान्डरडाइज.); टी. पी. एम.; विश्लेषण पध्दती इ.

टी. क्यू. एम. वापरुन आपण आपल्यात बदल घडवू शकतो. आपण आपल्या मोरेश्वराचे उदाहरण घेउ.

मोर्या रोज उशीरा ऑफीसला जायचा. बॉसच्या लक्षात आले, बॉस जाम ओरडला. आपल्या नेहमीच्या वेळेवर निघताना मोर्या कसा बसा तयार होत असे. आता नेहमीच्या वेळेच्या आधी निघायचे म्हणजे मोर्याला संकटच होते.

मोर्याने विचार केला. आपल्याला नक्की कशासाठी वेळ लागतो हयाचा आढावा घेतला. जवळ जवळ रोज मोर्याला पाकीट शोधायला वेळ लागायचा. पाकीट कधी कालच्या जीन्समध्ये, बेडरुम मध्ये, हॉलमध्ये, आरशावर, कपाटामध्ये, एकदातर पाकीट ऑफीसात आणी महाशय शोधत होते घरात!! आणि शेवटच्या ५ मिनिटातली ही लढाइ मोर्या नेहमी हरायचा.

मोर्याने ठरवले, ह्या पाकीटाचे काहीतरी करायला हवे. रोज वेळेवर जायचे तर ह्या पाकीटासाठी वेळ घालवणे परवडणारे नाही. खुप विचार केल्यावर मोर्याला एक युक्ती सुचली. मोर्याने पाकीटाची जागा निश्चीत करण्याचे ठरवले. पण जागा ठरवली तरी त्या जागेवर पाकीट ठेवायला हवे!! तीच तर खरी मेख होती. गंमत म्हणजे पाकीट वेळेत मिळण्यासाठी जागेवर ठेवायला हवे. मोरयाचे शिक्षक , आइ, बाबा; गोष्टी जाग्यावर ठेव हे सांगता सांगता म्हातारे झाले!! मोर्याला हे नक्की ठाउक होते की आपल्याला वस्तु जाग्यावर ठेवायला जमणार नाही.

मोर्याने हया गोष्टीसाठी व्यवस्थापकीय हुशारी ‘टी. क्यू. एम. विश्लेषण पध्दती’ वापरण्याचा विचार केला. वेगळा विचार, वेगळे उत्तर. पाकीट खिशातुन रोज काढल्यामुळे कुठेतरी ठेवले जाते आणि वेळेवर मिळत नाही. जर आपण पाकीट खिशातुन काढलेच नाही तर कालच्या जिन्समध्येच मिळेल, शोधाशोध वाचेल आणि वेळवर निघता येइल. ही कल्पना चांगली होती. आळशी मोर्याला फारच आवडली. पण संध्याकाळी घरी आल्यावर कुणी पैसे मागितले की पाकीट खिशातुन काढले जाते आणि सवयीनुसार कुठेही ठेवले जाते. सकाळी निघताना काल संध्याकाळी पाकीट कुठे टाकले ते आठवत नाही आणि वेळ वाया जातो. संध्याकाळी जरी पैसे लागले तरी पाकीटातुन न घेता, लॉकरमधुन घ्यायचे म्हणजे पाकीट कायम कालच्या जीन्समध्ये राहिल आणि न शोधता सापडेल.

मोर्याने ‘टी. क्यू. एम. मधील ‘का? का? ही विश्लेषण पध्दती’ वापरली.

मोर्याने स्वतःला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण पाहु

मला उशीर का होतो?मी पाकीट शोधत राहतो.मी पाकीट का शोधतो?पाकीट जीन्समध्ये नसते.पाकीट जीन्समध्ये का नसते?काल संध्याकाळी पैसे देण्यासाठी काढलेले असते.ह्याचा अर्थ पाकीट काढले नाही तर जाग्यावर मिळेल. पाकीट खिशातून काढल्यामुळे ते मिळत नाही आणि उशीर होतो.

पाकीट खिशातून काढणे हे मूळ कारण आणि त्याचा परिणाम म्हणजे उशीर होणे.

काही मंडळी म्हणतील ‘पाकीट परत जाग्यावर न ठेवल्यामुळे उशीर होतो’. अगदी बरोबर. पण माणसा माणसात फरक असतो. ज्यांना गोष्टी जाग्यावर ठेवण्याची सवय आहे. त्यांना उशीर होणारच नाही. गोष्टी जाग्यावर ठेवण्याची सवय अतिशय चांगली. पण ज्यांना गोष्टी जाग्यावर ठेवण्याची सवय नाही, त्यांचं काय? सवयही लागत नाही आणि आयुष्यभर नुसत्या शिव्याच खाव्या लागतात.

आपण दुसर्याला खुप काही विचारत असतो. स्वतःला कधीच काही विचारत नाही. दुसर्याला विचारल्यामुळे आपल्याला बर्याच गोष्टी कळतात. स्वतःला विचारल्यामुळे आपल्यात बदल घडवता येतात.

अशा तर्हेने मुळ कारणांचा विचार करुन, मोर्याने म्हटले तर साध्या, म्हटले तर कठीण अशा समस्येवर तोडगा काढला. आपणही जर स्वतःस “का?” असा सवाल विचारत गेलो तर, आपल्याला भेडसावणार्या समस्यांचे उत्तर शोधु शकतो. समस्या ही वैयक्तिक , कंपनीची, तांत्रिक असो किंवा नवी अथवा जुनी असो,”का” असा सवाल विचारत गेल्यास आपल्याला उत्तर मिळते.

अशा छोटया गोष्टी मोठा फरक घडवुन आणतात. आपल्याला सुद्धा असा बदल घडवायचा असल्यास आपल्या वागण्याचा आढावा घ्या. उत्तर त्यातच मिळेल.

ह्या आठवडयापासुन अशाच मोर्याच्या स्वतःच्या व फॅक्टरीमधल्या काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला किंवा तुमच्या कार्यालयातल्या, फॅक्टरीमधल्या काही गोष्टी बदलायच्या असतील तर आपण मोर्याची मदत घेउ, स्वतःला आणि आपल्या कंपनीला कार्यक्षम बनवु, तेही कमी वेळात, कमी त्रासात आणि कमी खर्चात!!!!

— महेश साठे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..