|| हरी ॐ ||
नभात झुलती मेघ:शामी,
आषाढीचा मुहूर्त साधुनी,
झाली धरणी ओलीचिंब,
पांडुरंगी रंगले चिंबूनी !
धावती वेडे पांडुरंगी,
वारकरी आनंदाने चिम्बुनी,
पांडुरंगे केली किमया,
वारकरी आनंदाला !
यंदा होता योग वेगळा,
नव्हता कधी पाहियेला,
पावसाने ओढ धरिली,
परी पांडुरंगे लाज राखली !
वारी पंढरीची वारकर्यांची,
डोळ्यासमोर मूर्ती पांडुरंगाची,
उन्हातान्हाची तमा नाही,
नेहमीच आस पांडुरंगाची !
आषाढीचा नेम वारकऱ्यांचा,
न चुकला गतानुगतीचा,
सदैव चाले भरभर पळभर,
कधी न कंटाळा, ना दमला विळभर !
श्री विठ्ठल, जयहरि विठ्ठल,
मुखात हा मंत्र महान,
झाले दर्शन विठुरायाचे,
चंद्रभागेच्या तीरावर ते,
आम्हीं वारकरी पंढरीच्या विठ्ठलाचे !
जगदीश पटवर्धन, दादर (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply