नवीन लेखन...

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे.

आठवडाभर कपडे धुऊन बघितले तर ते काम किती कठीण असते हे समजते. वॉशिंग मशिन मात्र हे काम न कुरकुरता करीत राहते. एक मात्र खरे की, ते विजेवर चालत असल्याने खर्चात वाढ होते.

वॉशिंग मशिनमध्ये जो ड्रम असतो त्यात आपल्याला पॅडल्स, रबर सील असे भाग दिसतात. हा ड्रम सच्छिद्र असतो. पॅडलमुळे कपडे पाण्यात फिरत राहतात. छिद्रांमधून पाणी वरून आत येते व खालून बाहेर पडते. रबर सील हे पाणी दरवाजातून बाहेर जाऊ नये यासाठी असते. यात कपडे साबणाच्या पाण्यात घुसळले जातात व नंतर स्पिनरचा वेग वाढून पाणी बाहेर टाकले जाते.

युरोपीय पद्धतीच्या मशिनमध्ये दोन ड्रम असतात. आतला ड्रम जो आपल्याला झाकण उघडताच दिसतो. आतला ड्रम फिरत असताना हा बाहेरचा ड्रम पाणी धरून ठेवतो. यातून पाणी बाहेर पडण्यास जागा नसते.

काही यंत्रांमध्ये आत येणाऱ्या पाण्याचे तपमान मोजणारा थर्मोस्टॅट असतो, पाणी काही प्रमाणात तापविलेही जाते. यात दोन पाइपमधून गरम-गार पाणी आत सोडले जाते तर तिसऱ्या पाइपमधून घाण पाणी बाहेर टाकले जाते, या पाइपना व्हॉल्व्हही असतात.

नवीन यंत्रांमध्ये ड्रायरही त्यात जोडलेला असतो, त्यामुळे कपड्यातील पाणी कमी करून मगच ते वाळत घातले जातात. जेव्हा कपडे धुण्याची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा ड्रम १३० कि.मी/तास या वेगाने फिरतो, त्यामुळे कपड्यातील पाणी कमी होते. सेंट्रीफ्युजच्या तत्त्वाने रिन्झिंग म्हणजे घुसळल्याने हा परिणाम साध्य होतो.

१६९१ मध्ये मिस फर्गसन यांना वॉशिंग मशिनचे पेटंट इंग्लंडमध्ये देण्यात आले.

१७५२ मध्ये एका जर्मन नियतकालिकात वॉशिंग मशिनचे डिझाइन प्रकाशित करण्यात आले होते. १९३७ मध्ये बेन्डिक १८५१ मध्ये अमेरिकेत जेम्स किंग याने वॉशिंग मशिनचे पेटंट घेतले. इलेक्ट्रिक वॉशिंग मशिनचा शोध अल्वा फिशर यांनी लावला असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात ते लुईस गोल्डनबर्ग यांनी शोधून काढले. १८५८ मध्ये हॅमिल्टन स्मिथ याने रोटरी वॉशिंग मशिन तयार केले. त्यानंतर सर्वात व्यवहार्य असे मशिन विल्यम ब्लॅकस्टोन याने अमेरिकेत तयार केले व ते पत्नीला बर्थडे गिफ्ट म्हणून दिले.

— राजेंद्र येवलेकर

मविपा चे ‘कुतुहल’ या सदरावरुन 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..