नवीन लेखन...

पाण्याच्या इडल्या

विद्यार्थ्यांना वर्गात आरसे आणि भिंगे शिकवतात. दरवेळी भिंगे बाजारातून आणूनच अभ्यासायला हवीत असे नाही. आपल्या घरातच ती मिळवायची. घरात इडली पात्र असते. त्या पात्रात पाणी भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे. त्या पाण्याचे बर्फ झाले की, बर्फाच्या त्या इडल्या बाहेर काढायच्या. त्यांची बहिर्गोल भिंगे झालेली असतात. शिवाय ती भिंगे पाण्याची असल्याने काचेच्या भिंगासारखी पारदर्शक असतात. भिंगे शिकण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे घरात ज्या सपाता चपला आपण घालतो त्याचे बंद तुटल्यावर अंगठ्यापासले बंदाचे भोक वरचे धरून मध्ये एक आणि टाचेच्या जागेपाशी एक अशी आणखी दोन भोके पाडावीत आणि त्यात टोक केलेल्या तीन पूर्ण लांबीच्या पेन्सिली प्रत्येक भोकात एकेक प्रमाणे सगळ्या पेन्सिलींची टोके एकाच बाजूला येतील अशा खोचाव्यात. आता सपाता चप्पल जाडीच्या बाजूने पाहिल्यास पेन्सिली एकाखाली एक अशा दिसतात. जणू सपाट आरशावर पडलेले किरण. आरशावर पडलेले किरण नेहमीच समांतर असे परत फिरतात. पण व्यवहारात आपल्याला किरण ही

संकल्पना समजत नाही, कारण प्रकाश हा किरणांचा मिळून बनलेला आहे एवढेच आपल्याकडून पाठ करून घेतलेले असते. आता या मॉडेलमुळे किरणांची संकल्पना थोडी तरी लक्षात येते..

नंतर सपाता वाकवून तिचे अंतर्गोल भिंग बनवावे. आता किरण एकवटून पेन्सिलींची टोके एकमेकींना चिकटतात आणि ज्या ठिकाणी ती चिकटतात त्याला नाभी अथवा फोकल पॉईंट ” म्हणतात. भिंगातून जेव्हा सूर्यप्रकाश (म्हणजेच किरण) जातात, तेव्हा आपण भिंग मागेपुढे हलवून प्रकाशाचा एक बिंदू मिळवायचा प्रयत्न करतो. तोच नाभी बिंदू. तेथे कागद धरला तर तो जळतो हे आपल्याला ठाऊक आहे, कारण या बिंदूपाशी सूर्यकिरणातील उष्णता एकवटून तापमान वाढलेले असते.

याउलट जेव्हा सपाता आपण बाहेरच्या बाजूला वाकवतो तेव्हा त्या सपाताला बहिर्गोल भिंगाचा आकार येतो आणि पेन्सिली एकमेकांपासून दूर जातात. यालाच किरणांचे अपसरण झाले असे आपण म्हणतो. शाळेत हे शिक्षण काल्पनिक पातळीवर चालते, त्यामुळे मुलांना ते अवघड जाते. पण अशा छोट्या छोट्या उपकरणांतून असे शिक्षण कोणालाही समजते.

-अ. पां. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..