नवीन लेखन...

कोरोनाला हरवू, आपणच जिंकू..!

प्रिय लोकहो,
धावपळीच्या दुनियेत कधी असं वाटलं ही नव्हतं की काही दिवस संपूर्ण जग असं एकदम थांबेल म्हणून. होय आत्ता फक्त पृथ्वी गोल फिरतंय पण जग थांबलेलं आहे. चीन मध्ये जन्म घेतलेल्या कोरोना या विषाणूमुळे अक्क जग बंद आहे.शाळेत असताना आपण डिक्शनरी चाळलोय पण कधी आपल्याला लॉकडाऊन या शब्दाशी संबंध आला नव्हता. हां तेच ज्या देशात कोरोना प्रादुर्भाव पसरलाय ते सगळे देश लॉकडाऊन लावलेत म्हणजे आपल्या भाषेत संचारबंदी. कोरोना या रोगामुळे काही देशच नव्हे मोठया,प्रगतशील,सुंदर अशी इटली,जपान, फ्रान्स, ब्रिटन,आस्ट्रेलिया आणि सर्वात मोठी लोकशाही देश असलेली आपल्या भारतातील मुंबई,दिल्ली या सगळ्यांना फटका बसलेली आहे.
मंदिर, मस्जिद, पार्क, सिनेमगृह, शाळा, महाविद्यालये आदी सर्व  या कोरोना मुळे बंद आहेत. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था या घडीला ठप्प झालेली आहे.या सर्व घटकांचा विचार केला तर आपला देश, जग पुन्हा सुरळीत कधी होईल असा प्रश्न पडला असेल आपल्याला..? नक्की याचा उत्तर ही आपल्याकडेच आहे.
याआधी जगाने भरपूर युद्ध पाहिलेत.प्लेग,स्वाईन फ्लू,चिकन गुनिया सारखी भरपूर रोग ही जगाने अनुभवलेत.पण कोरोना या रोगमुळे युद्ध काळापेक्षाही वाईट दिवस आत्ता जग अनुभवताना दिसतंय.
भारतात ही १९७५ ला ही आणीबाणी होती. पण त्यापेक्षाही आत्ताची परिस्थिती भयंकर आहे असं म्हणायला काही हरकत नाही.आत्ताची कोरोना सदृश्य  परिस्थिती जगाला खूप काही सांगते ती अशी की इथं माणसापासून माणूसच पळून जातोय.बिचाऱ्या त्या मुक्या प्राण्यांचं कसं त्यापासून ही माणसं लांब आहेत.अशी भयावहक स्थिती निर्माण झालेला सगळीकडे दिसतंय.कदाचित यापेक्षा युद्ध झालं तरी बरं झालं असतं  असंही काही जणांना वाटतं असेल कारण अशीही सगळी अर्थ व्यवस्था बिकट,विस्कळीत झाली.दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णामुळे कोरोना ला  थांबवायचं कसं,रोखायच कसं,याच्याशी लढा कसा द्यायचं,कधी एकदा हा रोग संपेल,कधी नोकरी ला जाऊ,कधी आपला व्यवसाय पुन्हा चालू होईल,मुलांचे शाळा,महाविद्यालये कधी चालू होईल असे विविध प्रश्न आपल्या मनाला भेडसावत असेल ,  कारण सध्या घरात आपल्या काही काम नसल्या मुळे सहाजिकच  आहे  हे आपल्या डोक्यात या प्रश्नाचं भडीमार होत आहे.
घरात  टीव्ही लावा कोरोना, हातात मोबाईल  पकडा   कोरोना,   बाहेर कुठे कट्ट्यावर बसा कोरोना च्यायाला हा रोग कुठून येऊन ठेपलंय रे असं वाटायला लागतं. जर कोरोनाला आपल्याला खरंच संपवायचं असेल किंवा त्याच्याशी सामना करायचं असेल तर आपल्याला माणुस म्हणून आपल्या स्वतःवर काही निर्बंध घालायला हवंय.मग ते निर्बंध कसले…?तर ते सरकार घालून दिलेल्या बंधन,आदेश,सूचना याचा काटेकोरपण पालन करत सरकार,प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करणं हा एकच पर्याय सध्या कोरोनाला हरवण्या साठीचा आहे.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता कधी आपल्या दाराजवळ येईल काय सांगता येत नाही.संचारबंदी लॉकडाऊन ही एक सर्व कुटुंब एकमेकांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी सुवर्णसंधी समजा आणि घरातच थांबून बाहेर विनाकारण न फिरता कुटुंबासमावेत वेळ घालवा.कोरोनाला हारावण्यासाठी आपण प्रत्येकाने सर्वतोपरी काळजी घ्या.लवकरच आपण या कोरोनाला हरवू ही लढाई आपण जिंकून पुन्हा एकमेकांना नक्की भेटूया.
— रमणराज राजेंद्रप्रसाद गड्डम 

Avatar
About रमणराज राजेंद्रप्रसाद गड्डम 1 Article
सिव्हिल अभियंता असून एक छोटासा मराठी लेखक बस्स.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..