सुस्वागतम दोनहजारबारा,घेऊन ये सुख स्वप्नांचा वारा ! प्रत्येक दुख:चा कर निचरा, स्पर्शुनि आपला मोर पिसारा !
नव्या वर्षात पीकपाणी चांगले,जळो जिणे लाजिरवाणे ! शेतकऱ्यांच्या पिकाला मिळो रास्त भाव, नको सरकारच्या ‘पॅकेज’चा डाव !
संसदेत विधेयके जनतेच्या भल्याची? पारित होउदेत सगळी एकदाची ! कटू आठवणी सरल्या वर्षात, विसरुनी जाऊ नववर्षात !
पन्नास टक्के महिला आरक्षणाने केला वांधा,निवडणुकीत सांगा कोणाचा झेंडा?जनतेला कळाली मतदानाची ताकद गाफील उमेद्वार झाले गारद !
संकल्प अमुचा लाच घेण्या न देण्याचा,आणि भ्रष्टाचारावर मात करण्याचा !संकल्प आमुचा झाडे लाऊन जगविण्याचा,इको-फ्रेंडली स्वीकारून प्रदूषण कमी करण्याचा !
संकल्प आमुचा गर्भलिंग चाचणी न करण्याचा,मुलींना आत्मसन्मानाने जगू देण्याचा !संकल्प आमुचा हुंडा देण्या न घेण्याचा,स्त्रियांना आत्महत्यांपासून वाचविण्याचा !
संकल्प आमुचा वाईट व्यसने न करण्याचा,समाजामध्ये जनजागृती करण्याचा !संकल्प आमुचा भक्ती आणि सेवेचा,मिळवाया सत्य, प्रेम आणि आनंदाचा !
जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरिवली (प)
Leave a Reply