मुकेश अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी यमनमधील अदेन शहरात झाला.
गुजरातेत जामनगरला धिरुभाई अंबानी यांनी पेट्रोकेमिकल युनिट्स सुरू केली. मुकेश अंबानी यांनी त्याचा पसारा इतका वाढवत नेला की, ती आज जगातील सर्वात मोठी पेट्रो केमिकल फॅक्टरी बनली. त्याच बरोबर पॉलिस्टर, माहिती तंत्रज्ञान या अणि अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी पाय रोवले. रिलायन्स ग्रुपमध्ये शेकडो उच्चविद्याविभूषित अधिकारी आहेत, तरी मुकेश अंबानी दररोज सकाळी ठरल्यावेळी कार्यालयात उपस्थित राहतात व संध्याकाळपर्यंत नियमीतपणे काम करतात. इतके करुनही सर्व मित्र, नातेवाईक, कर्मचारी यांच्या घरच्या मंगल कार्याला व संकटांच्या वेळी मुकेश अंबानी जातीने उपस्थित असतातच. मुकेश अंबानी आपला वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत. उलट कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांचा वाढदिवस ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मुकेश अंबानी शाकाहारी असून त्यांना भारतीय व्यजंने आवडतात. दाळ-भात, पोळी-भाजी. मुकेश अंबानी खवय्ये असून ताज कोलाबाची चाट त्यांना खूप प्रिय आहे. याशिवाय अंबानी आठवड्यात एकदा मैसूर कॅफेमध्ये डिनर करायला जातात. मैसूर कॅफे त्याचे फेव्हरेट प्लेस आहे.
भारतातील सगळ्यात श्रीमंत असूनही मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये आलेल्या पाहुण्यांना आपल्या हाताने वाढतात. मुकेश अंबानींच्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेतल्या जातात. अंबानीच्या बंगल्यात पाहुण्याची पसंतीचा स्वयंपाक केला जातो. एवढेच नाही तर ‘एंतटीलिया’मध्ये तयार होणारे जेवण हे पाहुण्याची पसंत विचारूनच तयार केले जाते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला मुकेश अंबानी आठवड्यातून दोन-तीनदा पत्नी नीता यांच्यासोबत चित्रपट पाहत होते. आताही आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मधील’ मूव्ही हॉलमध्ये बसून नीता अंबानींसोबत चित्रपटाचा आनंद घेतात.
मुकेश अंबांनी यांची संपत्ती युरोपातील विकसित देश म्हणविणाऱ्या इस्टोनियाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाइतकी (जीडीपी) झाली आहे, असे फोर्ब्स इंडिया या नियतकालिकामध्ये नमूद करण्यात आले.
मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे. मुकेश यांना बोइंग बिजनेस जेट-२ याच्यातून प्रवास करायला आवडते. जेटमध्ये त्यांनी आपल्या आवडीच्या सुविधा तयार करून घेतल्या आहेत. मुकेश यांचे जेट हे हवेत उडणारे हॉटेलच भासते. या विमानात एक आलिशान बोर्ड रूम, एग्झिक्यूटिव्ह ऑफिस आणि खासगी बेडरूम आहे. मुकेश यांनी लहानपणीच त्यांच्या वडिलांना सांगितले होते की, त्यांना मोठे झाल्यानंतर एक यशस्वी व्यावसायिक व्हायचे आहे. मुकेश अंबानी यांची लाइफस्टाइल त्यांच्या वडिलांप्रमाणे आहे. मुकेश अंबानी यांना चित्रपट पाहायला आवडतात. मुकेश अंबानी आपल्या मुलांना पॉकेटमनीमध्येव पाच रूपये द्यायचे. त्यांच्या मतानुसार मुलांना जादा पैसे देण्याेऐवजी गरजे इतकेच दिले तर त्याचा वापर योग्य होतो. मॅबॅच कार असलेले मुकेश हे एकमेव भारतीय आहेत.
मुकेश अंबानी यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply