बर्याचदा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला “प्रोफेसनल जेलेसी” चा अनुभव आला असेल . पण म्हणून तुम्ही तुमचे काम बंद करावे काय ? तर माझे यावर उत्तर नाही असेल , कारण अजून आपण जोमाने , ताकतीने आणि कुशलतेने काम करावे .
एका उदाहरणावरून तुम्हाला चांग्ल्यानी समजेल की “प्रोफेसनल जेलेसी” म्हणजे काय असते. दिनांक 15 ऑगस्ट 2017 ला प्रकशित होणारा “60, 000 प्रश्नांचा महासंच” हे पुस्तक ExamVishwa तर्फे प्रकाशित होत आहे, याची बातमी Social Media वर प्रसारित झाली . ही बातमी प्रसारित होताच काहींच्या पोटात दुखायला सुरु झाल आणि साहजिक आहेच दुखेल का नाही कारण पुस्तकाची किमत फक्त 70 रुपये आहे . जर याचप्रकारचे पुस्तक बाजारात घ्यायला गेले तर 1200 रु. च्या आसपास मिळेल , तेही एकत्रितरीत्या मिळणार नाही .
आता बघा जेलीसी करणाऱ्या माझ्या लाडक्या मित्रांच्या पोटात कसे दुखायला लागले तर ,
1) एका नामांकित प्रकाशकाने तर चक्क ऑफर दिली राव की सगळे प्रश्न तुम्ही आमच्या प्रकाशनातर्फे प्रकशित करा .
2) काहीचे असे call आणि sms आले की तुम्ही कसे काय एवढी कमी किमत ठेऊ शकता . जरा आमचाही विचार करा म्हणाले.(पुरे झाला यांचा विचार करून , बरेच कमावले तुम्ही )
3) कधीकाळ आम्ही सोबत काम करणारे मित्र होतो त्याने तर Play Store वर चक्क 1 स्टार देऊन आपल्या वागणुकीचा परिचय दिला . (मित्रा तुला देव असेच उचापती करण्याची बुद्धी देवो आणि या कामातच तू पी . एच . डी करावे) आता हे होते बोटावर मोजण्यालायक लोक ज्यांना आमचा उपक्रम आवडला नाही . चांगली गोष्ट आहे जर निंदकाचे घर शेजारी असले तर बरेच आहे , निदान हे तर कळते की आपन कुठे चुकतोय आणि आपली प्रगती होत चाललीय . म्हणून आम्ही निंदा करणार्यांना आमचे मित्र समजतोय . यांच्यापेक्षा आमच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे .
या सगळ्यांना Open Challenge आहे तुम्हीही करा, आम्ही तुम्हाला थांबवले काय ? आणि हो तुम्ही 1 स्टार द्या की 5 स्टार द्या त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही कारण तुमच्यासारखे विकृत बुद्धीचे आणि Narrow Minded लोकांमुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही , बरोबर आहे तुम्ही असेच विचार कराल कारण स्पर्धा परीक्षेतील “A B C D” तरी कुठे कळते .
मित्रानो बोटावर मोजण्यालायक लोक तुम्हाला नापसंद करतील पण तुमचे प्रशंसक लाखोच्या घरात असतील . त्यामुळे या तुमच्या चाहते मंडळींसाठी काम करा.
दोनच लोकांची चर्चा होत असते एक म्हणजे तुम्ही काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करता ( जसे कि ExamVishwa चे उपक्रम ) आणि दुसरे म्हणजे चोर, लुच्चे , लफंगे . म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण इतरांच्या वागण्यामुळे किवा बोलण्यामुळे आपले विचार , आपले ध्येय आणि धोरणे बदलू नका .
— प्रा. हितेशकुमार पटले
(8275289828)
Leave a Reply