नवीन लेखन...

बुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय ?

दि.१४ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमध्ये साबरमतीजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महाराष्ट्राचा नक्की काय फायदा होणार आहे…? महाराष्ट्रातील उद्योजक आणि शासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून हा ट्रॅक सुरु होईल. महाराष्ट्रात ४ तर गुजरात मध्ये ८ स्टेशन्स घेत बुलेट ट्रेन जाणार आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये प्रस्तावित जागतिक आर्थिक केंद्र सुद्धा तिथून हलेल असे आलेले वृत्त धडकी भरवणारे आहे. मुंबईची आर्थिक ताकद आपण कमी होऊ देऊ शकत नाही.

एकंदरीत महाराष्ट्रातील उद्योगावर जर याचा विपरीत परिणाम होणार असेल तर महाराष्ट्रासाठी ही चांगली बातमी नाही. एक महाराष्ट्रीयन या नात्याने माझा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे.

१) मुंबईतून अहमदाबादला कामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ५ टक्के, अहमदाबादवरून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची संख्या ९५ टक्के त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपले पैसे खर्च करणे म्हणजे “पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे”.

२) आत्ता ज्याप्रकारे रेल्वे खात्याचा कारभार चालू आहे,त्यातचं सुधारणेस भरपूर वाव आहे.लोकांना पायाभूत सोयीसुविधा देण्यात रेल्वे खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे.रेल्वेचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

मुंबईतील उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची अवस्था गुरा-ढोरांपेक्षाही वाईट आहे.या सर्व प्रश्नांकडे लक्ष न देता गुजरातमधील ठराविक व्यापाऱ्यांच्या (ज्यांच्या दावणीला सरकार बांधलयं) भल्यासाठी सरकार बुलेट ट्रेनचा घाट घालतयं हे सर्वसामान्य भारतीय जनतेवर घोर अन्याय करण्यासारखे आहे.

जी अवस्था काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची होती. त्यापेक्षा वाईट अवस्था आताच्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे.कारण पक्ष दोनचं व्यक्ती चालवत असून, त्यामध्ये एकाधिरशाही निर्माण झाली आहे.महाराष्ट्रचं स्वतंत्र असं अस्तित्व दिल्लीच्या राजकारणात दिसत नाही.कोणताही लहान सहान निर्णय घ्यायचा झाला तरी हे दिल्लीवाल्यांचा “उंबरठा झिजवतात” ह्यांना काय स्वाभिमान उरला आहे की नाही..? का हे त्यांचे गुलाम आहेत.

शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्याला हे अजिबात न शोभणारे आहे. महाराष्ट्राची वेगळी अशी छाप दिल्लीच्या राजकारणात उमटलीचं पाहिजे.”आंधळ दळतयं आणि कुत्र पीठं खातयं”अशी अवस्था आज महाराष्ट्राची झाली आहे.यांनी पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांचा आदर्श घेतला पाहिजे ज्यांनी दिल्लीमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलयं.

शेवटी, महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही. आत्ता असणाऱ्या रेल्वेचीचं सुधारणा करणे गरजेचे आहे. आम्हाला आवश्यक असलेल्या सुविधा द्या. सर्वसामान्य लोकांचं हित प्रथम मगचं तुमचं कायं ते पहा…!

पण आपण महाराष्ट्रातील उद्योगांनी सुद्धा आता कंबर कसली पाहिजे. कारण जी ट्रेन अहमदाबाद बावरून मुंबईला येते ती मुंबईतूनही अहमदाबादला जातेच कि काय..! अधिकाधिक मराठी उद्योजकांनी आता मुंबई गुजरात मध्ये धंदा वाढवण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. गुजरात वरून कच्चा माल आणि इथे आणून पक्का माल तिथे विकण्याचे धोरण सुरु केले जाऊ शकते. दुसरी एक भीती व्यक्त होते आहे, की मुंबईतील विविध बाजार हे गुजरात मध्ये जाऊ शकतात. ही पोकळी भरून काढण्या साठी मराठी व्यापाऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.

मराठी ग्राहकांनी सुद्धा ठरवावे, की शक्य तो माल मी मराठी व्यापाऱ्यांकडून विकत घेईन. तसेच आपण social media चा वापर करून # bullet train nakoch…!! हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त संदेश ट्विटरवर पाठवा.आत्ता विरोध केला नाही तर आपल्या पैशाची हे अशीच उधळपट्टी करून आपल्याला नको असलेले, सर्वसामान्यांचे हित नसणारे प्रकल्प आपल्यावर लादले जातील.
“एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ..!!

जय महाराष्ट्र….!!

— गणेश उर्फ अभिजित कदम

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..