नवीन लेखन...

सिलेंडरमधल्या गॅसचे स्वरूप काय असते?

आपण घरात स्वयंपाकघरात जो सिलिंडर असतो, त्यातल्या गॅसला म्हणतात एल. पी.जी. म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस! लिक्विफाईडचा अर्थ द्रव आणि गॅसचा अर्थ वायू ! लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे द्रव पेट्रोलियम वायू!

असं कसं बरं? द्रव की वायू – नक्की कोणत्या स्वरूपात सिलिडरमधलं इंधन भरलेलं असतं? सिलिडरमध्ये द्रवरुपात असलेला गॅस भरलेला असतो. आपल्याला सर्वांना वायूचं स्वरूप माहीत आहे. वायूच्या कणांना एकमेकांबद्दल जराही आकर्षण वाटत नाही म्हणून वायूचे कण एकमेकांपासून दूर जाण्याची जणू वाटच पहात असतात. म्हणून तर शेगडीचं बटन उघडं राहिलं तर गॅस साऱ्या घरभरात पसरतो आणि खिडक्या-दारं उघडली तर त्यातून बाहेर पडून साऱ्या वातावरणात पसरतो.

पण हाच वायू सिलिंडरसारख्या एखाद्या भांडयात भरला आणि यंत्राद्वारे त्यातल्या कणांना एकमेकांजवळ दाबलं तर काय होईल? वायूच्या कणांवर दाब देऊन त्यांना जवळ आणलं आणि कुठूनही भांड्याबाहेर पडू दिलं नाही तर एका ठराविक परिस्थितीत, या खूप खूप जवळ आलेल्या वायूच्या कणांना एकमेकांविषयी आकर्षण वाटायला लागतं. हे घडत असतांना तिथलं तापमानही कमी होत जातं. एका विशिष्ट तापमानाला आणि दाबाला वायूचं द्रवात रुपांतर होतं. पण अशा द्रवावरचा दाब परत कमी केला तर काय होईल? तर खूप दाबामुळे, जबरदस्तीने द्रवरुपात गेलेल्या वायूवरचा दाब कमी झाला तर त्याचंपरत वायूत रुपांतर होतं.

आपल्या घरातल्या सिलिंडरमधे खूप दाबाखाली द्रवरुपात गेलेला वायू भरलेला असलेल्या रेग्युलेटरची असतो. सिलिंडरला चावी फिरवली की त्या द्रवावरचा दाब कमी होतो. दाब कमी झाल्यामुळे द्रवरुपातला वायू हळूहळू वायूरुपात जातो आणि सिलिंडरच्या पाईपमधून सरकत शेगड्यांच्या बर्नरमध्ये येऊन पोहोचतो. वायू द्रवरुपात रुपांतरित करुन सिलिंडरमध्ये भरल्यामुळे तो कमी जागेत जास्त प्रमाणात मावतो आणि सुरक्षितपणे हाताळता येतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..