मजबुतीच्या सर्व तपासण्या झाल्यावर बांधकामाची भारक्षमता मूळ अपेक्षित पातळीपेक्षा कमी झाली असेल, तर त्याच्या प्रमाणानुसार उपाययोजना खालीलप्रमाणे करावी लागते.
१) जरी काँक्रीटची मजबुती समाधानकारक असली तरी जवळून बघितल्यास सूक्ष्म भेगा दिसून आल्या तर एपॉक्सीसारख्या लांबीने भेगा बुजवून घेऊन नंतर आतून-बाहेरून योग्य प्रतीचा रंग लावावा. त्यामुळे पावसाळ्यात बाष्प आत जाऊन स्थिती बिघडत नाही. दर तीन ते पाच वर्षांनी बाहेरून योग्य तपासणी करून आवश्यक त्या प्रतीचे रंगकाम केले पाहिजे.
२) मजबुती साधारण मूळ पातळीच्या ९० टक्के आहे, पण भेगा लांबून दिसण्याइतपत मोठ्या आहेत, अशा वेळी त्या भेगा नीट उकरून त्यात दाब यंत्राने (ग्राऊटिंग) इपॉक्सी वा तत्सम रसायन भरावे. अशा प्रकारची बरीच रसायने बाजारात उपलब्ध असतात. त्यानंतर कच्च्या ठिकाणचे प्लॅस्टर काढून तेथे नवीन प्लॅस्टर लावून रंगकाम करावे.
३) मजबुती २० ते २५ घ राघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे योग्य दाबाने व योग्य प्रमाणात सातत्याने घरात पाणीपुरवठा होत राहणे. वापरलेले सामान (पाइप, नळ, झडपा) पाणी व हवा यांच्या क्रियेने न गंजणारे असावे. माती, वाळू वा खडे पाइप लाइनमध्ये शिरण्यास प्रतिबंध करणे. सर्व व्यवस्थेत कोठेही गळती होणार नाही याची दक्षता घेणे व दीर्घ कळासाठी ती टिकाऊ असणे. काँक्रीटचे बांधकाम निकृष्ट व असुरक्षित असल्यास कोणते उपाय योजले जातात? टक्के कमी झाल्याचे आढळून आल्यास, बऱ्याच ठिकाणी भेगा आणि कोपऱ्यातील काँक्रीट तुटलेले आढळून आल्यास आतील सळ्या उघड्या पडलेल्या व त्या गंजलेल्या दिसल्या तर नुसत्या भेगा भरून किंवा काँक्रीटचे वेष्टण देऊन मजबुतीकरण होत नाही. प्रत्येक तुटक्या-फुटक्या खांबाला विरुद्ध बाजूकडून पोलादी खांब (चॅनलच्या सी आकाराचे) अगदी पायापासून त्यावरील तुळईच्या खालच्या अंगापर्यंत व्यवस्थित जॅकेटिंग करून बसवावे. ते पुन्हा आडव्या पट्ट्या वेल्ड करून जोडून घ्यावे. पायावर जेथे ते टेकले आहेत, तेथे पाचरीने वर तुळईला घट्ट टेकेपर्यंत उचलावे. काँक्रीटचे वेष्टण केल्याने खांबावरील भार नव्याने तयार केलेल्या लोखंडी खांबावर जाऊन मूळ सांगाडा मजबूत होतो. हे सर्व काम कुशल अभियांत्रिकी कंत्राटदाराच्याच हाती सोपवावे.
४) मजबुती ५०-६० टक्क्यांपेक्षा खाली घसरली असेल व भेगा वाढणे, प्लॅस्टर कोसळणे, स्लॅब झुकणे इत्यादी प्रकार होत असतील तर ती इमारत धोक्याची आहे, असे समजून अशी इमारत पाडून नवी बांधणे कमी खर्चाचे आणि सुरक्षित असते.
Leave a Reply