नवीन लेखन...

पांढरे शुभ्र दात

हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.

खरंतर दातांचा रंग नैसर्गिकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी असतो. दंतवल्क (एनॅमल) पारदर्शक असते, दंतवल्काच्या आत दंतिन असते, या दंतिनचा रेंग आपल्याला दिसत असतो. हा रंग बदलण्यास शरीरातील अंतर्गत तसेच बाह्य गोष्टी कारणीभूत असतात. दंतवल्कास तडे पडले तर अन्नपदार्थातील रंग दातांमध्ये शोषले जाऊन दातांना त्यांचा रंग येतो. चहा, कॉफी, मद्य, फळांचे रस, तंबाखूचे सेवन यांमुळेसुद्धा दातांचा रंग बदलतो. वयोमानानुसार दातांच्या रंगात फरक पडतो. जसे वय वाढते तसे दंतिनचा रंग गडद पिवळा होतो. दुधाच्या दातांवरील आवरण तसेच
(दंतवल्क) पारदर्शक नसते त्यामुळे दुधाचे दात पांढरे शुभ्र दिसतात. जर दात किडले तर दातांवर काळे डाग पडतात. काही आजारांमुळे टेट्रासायक्लिनसारख्या प्रतिजैविकांच्या सेवनांमुळे दातांचा रंग बदलतो.

नैसर्गिकरीत्या दात शुभ्र नसले तरी प्रत्येकाला पांढरे शुभ्र दात हवे असतात. दात शुभ्र करणाऱ्या अनेक टूथपेस्ट उपलब्ध आहेत. या टूथपेस्टमधे दातांवरील डाग नाहीसे हायड्रोजन करण्यासाठी पेरॉक्साइडचा वापर विरंजक द्रव्य (ब्लीचिंग एजंट) म्हणून केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड सूक्ष्मजीवविरोधकही आहे. हायड्रोजन पेरॉक्साइडबरोबर कार्बामाइड पेरॉक्साइडचा वापर काही टूथपेस्टमधे केला जातो. याशिवाय सोडिअम बायकार्बोनेट, पॉलीव्हिनाइल पायरोलीडन, सोडियम ट्रायपॉलीफॉस्फेट, पॅपिन हे नैसर्गिक एन्झाइम ही रसायने टूथपेस्टमध्ये वापरली जातात.

खरंतर सीलिका, कॅल्शियम कार्बोनेट ही अपघर्षके दंतवल्कावरील डाग दूर करतात आणि त्यानंतर दात शुभ्र करणारी रसायने आपले कार्य करतात. दातांवर डाग पडू नये म्हणून दातांची स्वच्छता नियमित ठेवणे आवश्यक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..