नवीन लेखन...

व्हाइट स्पिरिट

मिनरल टर्पेन्टाइन हे ‘व्हाइट स्पिरिट’ (स्वच्छ, पारदर्शक द्रावण) वर्गातले द्रावण असून ते १४५ ते २०५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळते. रंग, वार्निश, लेकर्स यांचे पृष्ठीय थर (सरफेस कोटिंग) देण्यासाठी हे द्रावण मोठ्या प्रमाणात वापरतात. या द्रावणात असलेल्या एरोमेटिक हायड्रोकार्बन्सच्या अंशामुळे त्याची द्रावणीयता वाढीव स्वरूपाची असते. त्याची ही द्रावणीयता व हळुवार उडून जाण्याची क्षमता यांच्या समतोलपणामुळे समप्रमाणात कोटिंग करताना खूप फायदा होतो. तसेच शाई तयार करण्यासाठी, कीटकनाशके निर्मितीसाठी, जलरोधक पदार्थ तयार करण्यासाठी या द्रावणाचा वापर होतो. ड्रायक्लिनिंग करताना, वूलनचे कपडे या द्रावणात भिजवून घुसळविले असता कपड्यातील तंतूत अडकलेले तेलाचे कण या द्रावणात विरघळतात व कपडे सुकविले की ते स्वच्छ दिसतात.

केरोसिनच्या वर्गात मोडणारी द्रावणे १६० ते ३०० अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळतात. एरोमेक्ससारखी द्रावणे या वर्गात मोडतात. मात्र, बेंझिन व टॉल्विन ही शुद्ध एरोमेटिक स्वरूपाची द्रावणे होत. त्यांचे उत्कलन बिंदू विशिष्ट तापमानाचे असतात. बेंझिन ८० अंश सेल्सिअसला उकळते तर टॉल्विन ११० अंश सेल्सिअसला उर्ध्वपातित होते. बेंझिनचा वापर नायलॉन, प्लास्टिक, कृत्रिम रबर, फिनोलिक रजीन-संयुगे, पॉलिस्टर, डिटर्जन्टस, औषधे, कीटकनाशके तयार करण्यासाठी होतो. टॉल्विनचा वापरदेखील रसायने, औषधे, स्फोटके, रंग, रेजिस तसेच खाद्यपदार्थांना स्वाद देणारे घटक तयार करण्यासाठी होतो. ही दोन्ही शुद्ध रसायने नॅफ्थापासून मिळविली जातात व त्यांच्या उत्कलन बिंदूनुसार वेगळी केली जातात. दोन्ही रसायने रंगहीन व ज्वालाग्राही असतात. त्यांना, विशिष्ट ‘एरोमॅटिक’ हायड्रोकार्बन्समुळे वास येतो. पेट्रोलियम द्रावणांचा वापर पाहता,, त्यांच्यात विशिष्ट गुणधर्म असणे आवश्यक असते. हे गुणधर्म विशिष्ट चाचण्यांद्वारे कटाक्षाने पडताळून पाहिले जातात. या द्रावणांची बाष्पशीलता (व्हॉलेटिलिटी), घनता, वास, द्रावणीयता (सॉल्व्हंट पॉवर), ज्वलनबिंदू हे काही गुणधर्म त्या त्या द्रावणाची कसोटी ठरवितात.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..