नवीन लेखन...

कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.

वस्तुत हल्ली समाजात ज्येष्ठ नागरिकांची एवढी संख्या उपलब्ध आहे की त्यांना आवाहन करुन जर काही अधिकार दिले असते तर त्याची अंमलबजावणी सहज झाली असती. शिवाय नागरिकांनी समजा खरोखरी शंभर टक्के अंमलबजावणी केली असती तरी त्याचा वेगवेगळा वापर कसा करायचा हे महानगरपालिकेने ठरविले नव्हते.

२-५ टक्के नागरिकांनी असे वर्गीकरण करायला सुरुवात केली होती. पण नंतर त्यांना असे दिसले की रस्त्यावरच्या कचऱ्याच्या पेटीत सगळा कचरा एकत्रच टाकला जात आहे. म्हणजे वर्गीकरण करण्याचा फायदा संपला. आणि मग जे काय २-५ टक्के लोक वर्गीकरण करीत होते त्यांचाही उत्साह संपला.

मुंबईत ज्योती म्हापसेकर यांच्या पुढाकाराने जी कचरा वेचक महिलांची संघटना काम करीत आहे, त्या महिला पूर्वी रस्त्यावरच्या प्रत्येक कचरा पेटीभोवती जाऊन त्यातील काच,फ्लॅस्टिक, कागद, पुठठे, खोकी, धातू, इतर वस्तू यासारख्या न कुजणाऱ्या वस्तू घेऊन जात असत आणि त्या भंगारवाल्यांना विकून चार पैसे त्यातून मिळवित. आता रस्त्यावरच्या पेटया नामशेष झाल्याने त्या महिला बहुतेक उकीरडयावर (डंपिंग ग्राऊंड) जाऊन कोरडा कचरा वेचत असणार.

संघटनेने या महिलांना महानगरपालिकेचे ओळखपत्र दिले. कचरा चिवडताना हातात मोजे घालायला शिकवले. एप्रन दिले, रोजच्या कमाईतले काही पैसे बचत करायला शिकविले आणि त्यांना कचऱ्याच्या सान्निध्यात राहिल्याने होणाऱ्या रोगराईपासून वाचवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष द्यायची जाणीव निर्माण करुन दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..