आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.
याची खालील दोन महत्वाची कारणे-
तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !
दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते….यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ….असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात….
आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत….
सुंदर विचार आहे.
नमस्कार.
अक्षतांच्या वापराबद्दल छान माहिती व विचार.
– अक्षत म्हणजे ज्याची झीज झालेली नाहीं / होत नाहीं, असें, न तुटलेलें. तांदुळाला कीड लागत नाहीं , हें तुम्ही लिहिलेलें आहेच. तसेच, अक्षता या, अनब्रोकन ग्रेन्स, म्षणजेच न तुटलेल्या तांदूळदाण्यांच्याच असतात.
– ज्याप्रामाणें तांदळाचें ट्रान्सप्लांटेशन होतें, त्याप्रमाणेंच मुलीचेंही होतें, हा सुंदर विचार आहे. ( मी माझ्या एक कवितेही हा विचार मांडलेला आहे. असो).
– तांदूळ ( व यव म्हणजे बार्ली ) हे भारतातील पहिले डोमेस्टिकेटेड धान्य आहे ( म्हणजे जे आधी वाइल्ड धान्य होतें, व ज्याची हेतुत: लागवड सुरूं झाली ) . (ही गोष्ट वैदिक काळाच्याही आधीची आहे) . कदाचित त्यामुळेही, भारतातील लग्नसंस्कारांमध्ये तांदळाचें महत्व असावें.
सुभाष नाईक.