ह्याचे छोटे बहुवर्षायू क्षुप डोंगराळ भागात पसरलेले असते.डोंगराच्या भेगांमधून ह्याचे कांड बाहेर येते.ह्याचे मुळ लाल रंगाचे स्थूल १-२ इंच लांब असते.पाने गोलाकार ५-१० इंच व्यास असलेली मांसल व दंतूर कडा असणारी वरच्या भागात हिरवी व खाली लाल रंगाची असतात.ह्याची ३-४ पानांपेक्षा जास्त पाने एकत्र आढळत नाहीत.ह्याची फुले श्वेत व गुलाबी रंगाची असतात.
चला आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात.पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)जखम व सुज ह्यावर पाषाणभेद मुळाचा लेप लावतात.
२)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारी तसेच अंगावर लाल अथवा पांढरे जाणे ह्यात हि ते उपयुक्त आहे.
३)मुतखडा फोडण्यास पाषाणभेद उपयुक्त आहे.
४)लहान बालकांना दांत येत असताना ह्याचे मुळ मधा सोबत चाटण करून देतात.
५)पाषाणभेद कफनिस्सारक असल्याने खोकल्यात उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar