वह सुबह कभी तो आएगी
जिस सुबह की खातिर जुग-जुग से,
हम सब मर-मर कर जीते हैं
जिस सुबह के अमृत की धुन में,
हम जहर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर,
इक दिन तो करम फर्मायेगी
वो सुबह कभी तो आयेगी……….
१९५८ मध्ये साहिरने “वह सुबह कभी तो आएगी”..या चित्रपटासाठी हे गीत लिहले. मुकेशनेही आपल्या काळीज चिरत जाणाऱ्या आवाजात गायले… राजकपूरच्या डोळ्यातले हे स्वप्न आजही अनेकांच्या डोळ्यात तसेच थिजलेले आहे…
मोहम्मद झवूर हाश्मी हा पजांबच्या राहोन शहरातला एक तरूण मुकेश, तलत मेहमूद, वीरू देवगन, सलीम खान यांच्या सारखे नायक बनायचे स्वप्न घेऊन मायापूरी मुंबईत दाखल झाला खरा पण मायानगरीला त्याला संगीतातला हिरो करायचे असावे …तो झाला खय्याम……खय्यामचा एक अर्थ आहे तंबू शिवणारा….या अवलियानेही तंबू शिवले पण संगीताच्या सूई धाग्याने अन् तेही त्याची वीण कधीच उसवू नये असे.
अत्यंत मोजकेच पण हृदयस्पर्शी काम करणाऱ्या संगीतकारात खय्यामचे स्थान नक्कीच वरचे आहे……१९५० मधील ‘अकेले मे वो तो घबराते होंगे’ (रफी साहब)या गाण्या पासून सुरू झालेला संगीतमय प्रवास २०१४ (बाजार-ए- हुस्न)पर्यंत येऊन थांबला तो त्यांच्या वार्धक्य आणि आजारपणामुळे……
‘इन आँखों की मस्ती के, मस्ताने हज़ारों हैं
इन आँखों से वाबस्ता अफ़साने हज़ारों हैं’
खय्यामच्या संगीतात मध्य लयीत रमत गमत जाणारा एक ठेका नेहमीच ऐकू येत असे. अनेकदा हा ठेका एक मात्रा सोडून पूढे जाई व गायकाला समेच्या ठिकाणी नेमका कवेत घेई………….माणसं तर कायमची जाणारच असतात माझ्या सकट….. पण काहीचे जगणे कुणाला तरी बळ देऊन कायमचे निघून जाते…….मळभ दाटून येतं…ते दूर ही त्यांच्या संगीतामुळे होईल…..
हज़ार राहें, मुड़के देखीं
कहीं से कोई सदा न आई
बड़ी वफ़ा से, निभाई तुमने
हमारी थोड़ी सी बेवफ़ाई
जहाँ से तुम मोड़ मुड़ गये थे
वो मोड़ अब भी वही खड़े हैं
अलविदा खय्यामजी…
— दासू भगत
Leave a Reply