स्त्री आहे अंबा,दुर्गा आणि काली,
अष्टभुजा धारण करणारी रणरागिणी.
सांभाळ करून सर्व नात्यांचा प्रेमाने,
गाजवते अधिराज्य जगात शक्तीने आणि युक्तीने.
बाबांच्या ह्या इवल्याश्या परीने,
फुलविला तिचा संसार स्वकर्तृत्वाने.
मिळाली देणगी मातृत्वाची हिच्या उदरी,
संयमाने करते ती पालनपोषण दिवस-रात्री.
शिकवतेस जगाला प्रेम, आपुलकी आणि माया,
नाही पडू देत संसारावर कधी दुःखाची छाया .
सांभाळताना तुझ्या संसाराचा गाडा,
राखून ठेव वेळ वेगळा तुझ्यासाठी थोडा.
घे आकाशात उंच भरारी
मात्र लक्षात ठेव पाय असू दे जमिनीवर पोरी
-सौ. मुक्ता शैलेश मोहोड
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply