नवीन लेखन...

जागतिक प्राणी दिन

आज जागतिक प्राणी दिन आहे.

‘सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.

खरे तर माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत. जंगलातील प्राण्यांचा चोरटा व्यापार, प्राण्यांवर प्रयोग करणे, त्यांना खाणेपिणे न देणे, कमी जागेत किंवा सतत बांधून ठेवणे, त्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडून नको तितके काम करून घेणे, जिवंत प्राण्यांचेही अवयव काढणे, प्राण्यांपासून विविध वस्तू बनविणे, झुंज लावून एकाचा जीव जाईपर्यंत ती चालवणे, जिवंत प्राणी खाणे वा शिजवणे….अशा आणि इतरही अनेक प्रकारांनी माणसे प्राण्यांचा छळ करत असतात !

या मुक्या पशुपक्ष्यांची भाषाही आपल्याला समजत नसल्याने त्यांच्या समस्यांत भरच पडते. याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर सामुदायिक आवाज उठवण्याचे आणि काही कृती करण्याचे महत्त्व ‘ वर्ल्ड ॲनिमल डे ’ ला सांगितले जाते. या निमित्ताने आपण प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू (हस्तदंती मूर्ती, कातडी बॅग्ज, वा पर्सेस इ.) खरेदी न करण्याचे ठरवून पशुपक्ष्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीस अटकाव करावा.

— अनिल सांबरे
9225210130 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..