दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरुपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा केली. २६ जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (१९८७) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.
या दिनी व्यसनांच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती तसेच पोलीसांचे अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा यांच्या वतीने समाजात प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.
कोणते आहेत अंमली पदार्थ?
या पदार्थांचे सेवन केल्याने एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा आणि धुंदी येते त्यांना मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ म्हटले जाते. अफू, मॉर्फीन, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, भांग, एलएसडी, पेफेडाईन, केटामाईन, कोडेन, पॉपी स्ट्रॉ इत्यादी अंमली पदार्थांचा समावेश होतो.
अंमली पदार्थांमुळे कोणते होतात आजार?
अंमली पदार्थांमुळे अनेक मोठ-मोठे आजार होतात. यामध्ये कर्करोग, घसा दुखणे, खोकला, कफ वाढणे, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, अल्सर, लकवा, रक्तक्षय, पंडु, गर्भपात, फुप्फुसरोग इत्यादी आजार उद्भवतात.
यावर उपाय काय?
अंमली पदार्थ्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्याची मानसिकता जाणून घेऊन त्यांना प्रथम समजून सांगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या अंमली पदार्थांमुळे कोणते आजार होतात याची जाणीव करुन द्यावी. त्याचबरोबर अंमली पदार्थांमुळे कोणते आजार होतात याची जनजागृती करावी.
Leave a Reply