नवीन लेखन...

जागतिक बिकिनी डे

बिकिनी प्रथम घातली गेली ती ५ जुलै १९४६ या दिवशी. आज बिकिनी आता ७४ वर्षांची झाली पण तिची क्रेझ आणि हॉटनेस वाढत गेला हे सत्य. पूर्वी स्विमिंग पूल पुरती मर्यादित असलेली ही आरामदायी बिकिनी आता खेळ मैदान तसेच सौंदर्य स्पर्धात मधूनही मोठ्या दिमाखाने मिरविली जात आहे तसेच व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते.

इ.स.पूर्व ५६०० मध्येच बिकिनी शैलीतील महिलांच्या कपड्यांचे पुरावे सापडले आहेत. रोमन कालखंडात काही महिलांनी बिकिनी सारखे कपडे परिधान केल्याची काही उदाहरणं इतिहासात पाहायला मिळतात. त्यावेळेस होणाऱ्या काही खास एथलेटिक इव्हेंटमध्ये महिलांनी असे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळतं. मात्र ‘बिकिनी’ फॅशन ही सर्वार्थाने नावारुपाला आली किंवा उदयास आली ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात.

त्याचं झालं असं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत सन बाथची फॅशन आली होती. अमेरिका विचारांनी आता जेवढा पुढारलेला देश आहे, साहजिकच तेंव्हा तेवढा पुढारलेला नव्हता. अशातही अमेरिकेत त्यावेळी महिलांना सनबाथ घेण्याची परवानगी होती. पण त्यासाठी अट मात्र एकच, ती म्हणजे महिलांनी गळ्यापासून ते गुडघ्यापर्यंत खाली डाऊन एक गाऊन परिधान करायचा आणि मगच सनबाथ घ्यायचा.

अमेरिकेत या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे वारे होते. पाहता पाहता दुसरं महायुद्ध सुरु झालं. दुसऱ्या महायुद्धामुळे सगळीकडे महागाई प्रचंड वाढली. अनुषंगाने कापड प्रचंड महाग झालं. कापड महाग झाल्याने सरकारकडून कमीत कमी कापड वापरण्याचा फतवा निघाला. दरम्यान समाजात सनबाथची फॅशन होतीच. महिलांचा सनबाथ गाऊन जास्त कापड खातो, म्हणून महिलांकडून सनबाथसाठी वापरण्यात येणाऱ्या गाऊनच्या उत्पादनावर सरकारने बंदी आणली. बंदी आणताना सरकारकडून सांगण्यात आलं की, “सनबाथसाठी वापरला जाणारा गाऊन हा कमीत कमी कपड्यात बनवा” आणि अशातच जन्म झाला बिकिनीचा.

फ्रेंच इंजिनिअर लुइस रिचर्ड हा बिकीनीचा जन्मदाता. त्याने सर्वप्रथम बिकिनी बनविली आणि त्याला बिकिनी अॅटॉल असे नाव दिले.

अमेरिकेने त्यावेळी बिकनी अटोल या जागेवर न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली होती. अमेरिकेने केलेली ही एक क्रांतिकारी चाचणी होती. याच धर्तीवर रुई यालादेखील त्याने लावलेला नव्या सनबाथच्या ‘टू पीस’ स्वीमसूटचा शोध हा प्रचंड क्रांतिकारी असल्याचं वाटत होतं आणि म्हणूनच ज्या ठिकाणी न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेली त्या जागेच्या नावावर रुई याने आपल्या आविष्काराचं नाव ठेवलं ‘बिकिनी’ आणि अशी जन्माला आली ‘बिकिनी’.

लुइस ला बिकिनी सादर करण्यासाठी एका मॉडेलची गरज होती. त्यावेळी पॅरीस मधील मॉडेल मिशेलिन बर्नाडीनो हिने हे आव्हान स्वीकारले आणि सर्वप्रथम बिकिनी परिधान केली गेली तो दिवस होता ५ जुलै १९४६.

मिशेलिनने ही बिकिनी घातली मात्र ती वृत्तपात्रांची हेडलाईनची बातमी झाली. विशेष म्हणजे पुरुषवर्गाला बिकिनी फारच भावली आणि मिशेलिनला ५० हजार प्रशंसकांची पत्रे आली. तत्पूर्वी डिझायनर हेम याने तयार केलेला छोटा बेदिंग सूट वापरत होता पण बिकिनी त्यापेक्षाही छोटी असल्याने पाहतापाहता लोकप्रिय झाली. सुरवातीला इटली सह अनेक देशांनी बिकिनीवर बंदी घातली होती मात्र १९५० ते ६० या दरम्यान ही बंदी उठविली गेली.

त्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दिसते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली.

व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet ची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. बिकिनीमधल्या काही मॉडेल्स एअर होस्टेस म्हणून अनेकदा व्हिएतजेटच्या जाहिरातीत दाखवण्यात येतात. या बोल्ड जाहिरातींमुळे ही विमानसेवा नेहमीच विवादात सापडली आहे. पण, असं असलं तरी या विमानसेवेला व्हिएतनामी प्रवाशांची मात्र तुफान प्रसिद्धी लाभली आहे.

व्हिएतनाममधल्या Nguyen Thi Phuong Thao या महिलेनं ही विमान सेवा सुरू केली होती. Vietjet ही खासगी कंपनी असून या विमानसेवेमुळे होणाऱ्या आर्थिक नफ्यामुळे Nguyen Thi Phuong Thao व्हिएतनामधल्या अब्जाधीशांच्या यादीत जाऊ बसली आहे. बिकिनीतील एअर होस्टेस या संकल्पनेमुळे जगभरात या विमानसेवेची खूप निंदा झाली. जगाच्या तुलनेत ही विमानसेवा निंदनीय असली तरी या विमानसेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र दिवसागणिक वाढतच आहे आणि याचा बक्कळ फायदा कंपनीला होत आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..