वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी, म्हणून आज जागतिक पुस्तक दिवस या दिवसाचे आयोजन केले जाते.
तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.
वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनासा झाला आहे.
अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोपर्याषत घडणार्याब घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. परंतु जुन्या पिढीमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. जवळ जवळ 80 टक्याच्या वर जनता निरक्षरच होती त्यामुळे वाचनाचा मक्ता काही सुधारलेल्या सुशीक्षित समाजापुरताच सिमीत होता आता शिक्षण सर्व सामान्यापर्यंत पोहोचले आहे परंतु इतर प्रसार माध्यमांच्या बाहुल्यामुळे प्रत्यक्ष वाचन आणि तेही कसदार वाचन निश्चितच कमी झालेले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply