दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच ७ जुलैला जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो. परंतु गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे या दिवसाचा गोडवा काहीसा कमी झालेला आहे.
७ जुलै १५५० रोजी युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेट दिवस साजरा करण्यात आला. यानंतर संपूर्ण जगभरात हा दिवसा साजरा होऊ लागला. असं म्हणतात की, चार हजार वर्षांपूर्वी चॉकलेटचा म्हणजे ज्या बियांपासून चॉकलेट बनवलं जातं, त्याचा शोध लागला. याचं झाड सगळ्यात आधी अमेरिकेत पाहिल्याचं सांगितलं जातं. या झाडाच्या फळांच्या बियापासून चॉकलेट बनवलं. सुरुवातीला अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये यावर प्रयोग झाले. त्यानंतर १५२८ मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर ताबा मिळवला. तिथे राजाला ‘कोको’ फार आवडलं आणि त्यानंतर राजाने कोकोच्या बिया मेक्सिकोतून स्पेनमध्ये आणल्या. तेव्हापासून तिथे चॉकलेट प्रचलित झालं, असं सांगितलं जातं.
सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करुन यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरुपात असलेलं चाऊन खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं.
१८२८ मध्ये डच केमिस्ट कॉनराड जोहान्स वान हॉटन नावाच्या व्यक्तीने कोको प्रेस नावाचं यंत्र बनवलं. या यंत्राद्वारे कोकोची चव बदलण्यास यश आलं.१८४८ मध्ये जे. एर फ्राई अँड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीने पहिल्यांदा कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर एकत्र करुन त्याला घट्ट चॉकलेटंच स्वरुप दिलं.
चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. ‘डार्क चॉकलेट’ खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
कोणाचा वाढदिवस असो, एखाद्याला मनवायचे असेल किंवा सण-उत्सव असतील याला विशेष बनवायचे असल्यास ते चॉकलेट शिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे चॉकलेटसाठी वेड असणाऱ्या सर्व चॉकलेट प्रेमीना चॉकलेट दिवसाच्या शुभेच्छा.
आज जागतिक चॉकलेट दिवसा निमित्त कवी राजा मंगळवेढेकर यांचे ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’हे एक सुंदर बालगीत.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥धृ॥
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
शेपटीच्या झुपक्यान झाडून जाई खार ॥१॥
गोल गोल लेमनच्या खिडल्या दोन
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन
बिस्किटांच्य्हा गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल ॥२॥
चांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो
मोत्याच्या फुलातुन लपाछपी खेळतो
खेळतो छपी खेळतो
उंच उंच झोक्याला खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥३॥
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply