नवीन लेखन...

जागतिक वसुंधरा दिवस

सॅन फ्रान्सिस्को येथील अमेरिकन पर्यावरण कार्यकर्ते जॉन मॅकोनेल. विस्कोन्सिन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पुढाकार घेऊन २२ एप्रिल १९७० ला पहिला जागतिक वसुंधरा दिवस उर्फ ‘अर्थ डे’ साजरा केला. तेव्हापासून दर वर्षी हा दिवस घंटानाद करत जगभर साजरा करण्यात येऊ लागला. हिरवी वने, पाणी, हवा, माती आदी नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा हादेखील आपल्या वसुंधरेवर मर्यादित आहे. पण अमर्याद मानवी गरजा पूर्ण करण्यासाठीचे मार्ग शोधणे आवश्युक आहे. गारपीट, विजांची वादळे, दुष्काळ, उत्तराखंडसारख्या ढगफुटी, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तींबरोबरच वीजटंचाई, इंधनटंचाई, भोपाळ गॅस दुर्घटनेसारख्या औद्योगिक आणि अ-नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी जीवन दिवसेंदिवस बिकट बनत आहे. महागाईने ना केवळ मानवी मनाची शांतता हिरावून घेतली आहे, तर मानवी समूहाच्या संयमाचीही कसोटी लागली आहे. या बिकट परिस्थितीची केवळ जाण असून भागत नाही, तर त्याचे कायमस्वरूपी भानही आपल्याला असायला हवे.

‘जागतिक वसुंधरा दिवस’ साजरा करण्यासाठी मोठमोठे बोर्ड हातात घेऊन रस्त्यावर उतरूनच प्रदर्शन करावे असा काही नियम नाही. एक दिवस सायकल चालविली म्हणजे खूप काही ‘दिव्य’ केले, असा गोड समज करण्याचीही गरज नाही. खरंतर साध्या-साध्या गोष्टी करत दररोज ‘इन्सान बचाव’साठी ‘वसुंधरा बचाव’ अभियान आपण राबवू शकतो.

आपल्या पिलांना मोकळा श्वानस घेत बागडण्यासाठी ‘स्पेस’ आणि उडण्यास ‘आकाश’ देण्यासाठी सुजाण प्रयत्न केवळ आपल्याच हातात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर ‘ग्राउंड टु स्मार्ट अर्थ’ असा करीत सुंदर, सुव्यवस्थापित आणि सुसज्ज वसुंधरेचे ‘खरेखुरे स्वप्न’ पाहण्याची संधी भावी पिढीला केवळ आपणच उपलब्ध करून देऊ शकतो. मला काय करायचे, यापेक्षा ‘मी काय करू शकतो’ ही आपली भूमिकाच खरंतर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी ‘सेल्फ आयडेंटिटी’ (स्वतःची ओळख) निर्माण करते.

आपले जग बदलणे आणि त्यासाठी योग्य किंमत मोजणे, हे धाडस शेवटी मानवी समूहच करू शकतात. वृक्षारोपणाने वसुंधरेला हिरवा शालू नेसवण्याचे स्वप्न साकार करण्यास चाललेल्या धडपडीत आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. सकारात्मक विचार केला, तर आपण एकटेच काय करू शकतो, याची लांबलचक यादीदेखील बनविता येईल. जागतिक सुटीचा हिरवा दिवस साजरा करताना वानगीदाखल काही उदाहरणे येथे देत आहे.

मी काय करू शकतो?

१) स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक्स तंत्राचा वापर- जसे गच्चीवरून टाक्यांतून वाहून जाणारे हजारो लिटर पाणी वाचविणे.

२) बिल्डिंगमधील कुणाच्याही घरात चुकून नळ सुरू राहिला तरी ती व्यक्ती घरी नसताना रिमोट कंट्रोलच्या मदतीने नळ बंद करण्यासाठी ‘एक्च्युएटर वॉल्व्ह’ वापरणे.

३) वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कमीत कमी जागा वापरून उभारलेली ‘स्मार्ट होम्स’ विकसित करणे.

४) कमी जागा व्यापणाऱ्या आवश्याक घडीच्या फर्निचरची व सुबक-सुसज्ज स्मार्ट उपकरणांची निर्मिती करणे.

५) विजेच्या जुन्या दिव्यांऐवजी ‘एलईडी लॅम्प’चा वापर करणे.

६) दात घासताना दररोज बेसिनचा नळ, टॉयलेटचा फ्लश सुरू ठेवण्याची सवय बदलून, पाणीप्रवाह नियंत्रित करणे.

७) दुष्काळाची होरपळ कमी करण्यासाठी वाहन धुण्याऐवजी स्वच्छ पुसण्याचा पर्याय वापरणे.

८) वाहनांचा मर्यादित वापर व पायी चालून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे.

९) सौर, पवन, बायोगॅस असे पर्यायी ऊर्जेचे स्त्रोत वापरणे.

१०) धरण, नदी, तलाव, विहीर यांतील गाळ काढून पाण्याची साठवणक्षमता वाढविणे.

११) गल्लीतल्या पाइपलाइन आणि रस्तेदुरुस्ती करवून घेण्यासाठी प्रयत्न करणे.

१२) सिमेंट काँक्रीटच्या ‘प्रगत’ पथावर जमिनीत पाणी झिरपण्यास जागा ठेवूनही भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविणे.

१३) सांडपाणी, कचरा याची योग्य विल्हेवाट लावणे.

१४) घनकचऱ्यापासून कमी खर्चात मजबूत व टिकाऊ विटांची निर्मिती करणे.

१५) ओला कचरा बागेत जिरवून प्रदूषण नियंत्रण करणे.

१६) बदलत्या ‘मॉन्सून पॅटर्न’मध्ये तग धरू शकतील अशा नवीन बी-बियाणांची निर्मिती करणे.

१७) योग्य कॅलरी असलेल्या पिकांची लागवड, शेती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन वाढविणे.

१८) बदलत्या हवामानाचा प्रत्येक ‘अलर्ट’ थेट आपल्या मोबाईलपर्यंत पोचविण्यासाठी ‘ॲ‍प्लिकेशन’ विकसित करणे.

१९) गारपिटीने महाराष्ट्र उद्ध्वीस्त होत असताना शिल्लक काड्यामधूनही कणकण वाचवत मणभर साठविणे.

२०) परसातील बागकाम, शहारातील गॅलरीत लटकणाऱ्या शोभेच्या कुंड्यांचे व टेरेसवरील जागेचे भाजीपाला लागवड क्षेत्रात रूपांतर करणे.

२१) स्त्री-पुरुष समानतेचा विचार मनामनात रुजविणे, हम दो हमारा एक, संततिप्रतिबंधक साधनांबाबत जागरुकता, एकनिष्ठतेच्या विश्वा सावर उभारलेली कुटुंब-शाळा बळकट समाजनिर्मिती घडवतानाच जनसंख्या अधिभारदेखील मर्यादित करू शकतो.

२२) आपले जीवन सुखकर व्हावे यासाठी टेकड्यांवर जाऊन वृक्षलागवड करता येईल.

२३) घराच्या जवळ एखादे रोपटे वृक्ष होईपर्यंत वाढविणे व तसा संस्कार नव्या पिढीत रुजविणे.

या जागतिक दिवशी अशा अनेक गोष्टींचा ‘अंजेडा़’ आपल्या ‘रडार’वर येणे व त्यासाठी आपल्या मेंदूचा ‘सुपर कॉम्प्युटर’ जागृत असणे गरजेचे आहे. याने आपल्या जीवनात हिरवळ येणार आहे. वसुंधराच नव्हे, तर आदमी बचावचा ‘स्वार्थ़ साधण्याची ‘परमार्थ’ संधी ‘अर्थ डे’ देतो आहे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..