१९९२ साला पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘दिव्यांग दिन’ म्हणून हा दिवस पाळला जातो. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, व दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो.
विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून १९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास प्रेरित केले होते. दशकाअखेरीस ‘तीन डिसेंबर’ या दिवसाची निवड झाली होती.
यानंतर १९९२ साली पहिला ‘दिव्यांग दिन’ साजरा करण्यात आला होता.
Leave a Reply