दिनांक 3 मार्च श्रवण दिन. World_Hearing_Day
कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी विशिष्ट थीम जाहीर केली जाते. ३ मार्च २००७ रोजी WHO मध्ये प्रथमच जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आला. २०१६ मध्ये त्यांनी हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.पूर्वी ते इंटरनॅशनल इअर केअर या नावाने ओळखले जायचा. जगातील 360 दशलक्ष लोक ऐकण्याच्या आजाराने ग्रस्त आहेत.
अलीकडे तरुण पिढीकडून हेडफोनचा अतिवापर होत असून, हेडफोनचा अतिवापर, मोठ्या आवाजात गाणे ऐकणे, ८० डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज, यामुळे श्रवणशक्तीचे गंभीर नुकसान होते.
‘आइए कान और सुनने की देखभाल को सभी के लिए वास्तविकता बनाएं’ ही यावर्षीच्या जागतिक श्रवण दिनाची थीम आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता
Leave a Reply