MENU
नवीन लेखन...

जागतिक होमिओपॅथी दिन

होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात १० एप्रिल हा दिवस होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो.

सध्याच्या काळात होमिओपॅथी ही खूप लोकप्रिय व सशक्त उपचार पद्धती म्हणून प्रसिद्ध आहे.

जगातील ८५ हून अधिक देशांमध्ये होमिओपॅथीचा लाभ घेतला जात असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक स्तरावरील होमिओपॅथी बाजारपेठेमध्ये फ्रान्सचा वाटा सर्वाधिक असून त्यापाठोपाठ जर्मनीचा क्रमांक लागतो.

इंग्लंडमध्ये होमिओपॅथी रुग्णालये ही त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतील महत्त्वाचा भाग आहे. भारतात सुद्धा होमिओपॅथीचा वापर करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

भारतात ३ लाखांहून अधिक अर्हताप्राप्त होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स आहेत. तसेच देशात ७ हजार ५०० होमिओपॅथीचे शासकीय रुग्णालये असून या रुग्णालयात होमिओपॅथीद्वारेच उपचार केले जातात. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १८० शैक्षणिक संस्थेकडून होमिओपॅथीचे शिक्षण दिले जाते. होमिओपॅथीची औषधे ही अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे कुठलेही साईड इफेक्टस होत नाहीत. विशेष म्हणजे या औषधांचे परिणाम हे दीर्घकाळ टिकणारे आहेत. या पॅथीतील औषधे घेण्यास सुलभ असतात.

होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात. होमिओपॅथी ही अधिक व्यक्तिगत अशा स्वरूपाची उपचारपद्धती असल्याने आणि यात डॉक्टर व रुग्ण यांच्यात अधिक प्रमाणात सुसंवाद होत असल्याने १५० दशलक्षहून अधिक लोक होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर करतात. ॲ‍ललोपॅथिक उपचार पद्धतीच्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या साईड इफेक्टसमुळे होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती असल्याचे ८० टक्के लोकांना वाटते.

संधीवात, मूळव्याध, मूतखडा, सोरायसिस, दमा, ऍलर्जी, कॅन्सर, यकृत विकार, किडणी फेल्युअर इत्यादी जुनाट व गंभीर आजारांवर होमिओपॅथिक उपचाराने नियंत्रण मिळविता येते.लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व व डिप्रेशन, रिक्जोतफ्रेनिया इत्यादी मानसिक विकारात होमिओपॅथी विशेष उपयुक्त ठरलेली दिसते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..