ॲमेझॉनचे जंगल तर वनस्पती आणि प्राण्यांच्या तीस लाख प्रजातींचे आश्रयस्थान आहे. हे जंगल जगातील सर्वात मोठे सदाहरित जंगल आहे
ॲमेझॉनचं जंगल हा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. बाहेरील लोकांसाठी ॲमेझॉनचं गुढ आणि रहस्यानं भरलेलं जंगल नेहमीच खुणावत असतं. जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल अशी संपन्न जैवविविधता ॲमेझॉनच्या खोऱ्यात आहे. या जंगलाचा अवघा काही टक्के भागही आपण पाहिला नसेल. इथे दरदिवशी नव्यानं काहीतरी सापडतं असतं, म्हणूनच हजारो रहस्य आपल्या पोटात लपवलेलं हे जंगल अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत चाललं आहे.
ॲमेझॉनच्या जंगलात अनेक आदिवासी जमातींचं वास्तव्य आहे, बाहेरच्या जगाशी या लोकांचा कोणताही संबंध नाही.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply