दरवर्षी फेब्रुवारी महीन्याच्या तिसर्या शनिवारी जागतीक खवले मांजर दिवस दिवस पाळला जातो.
इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचरच्या रेड डाटा बुकनुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे. या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी संपुर्ण वनविभाग सरसावला आहे.
खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. मांस, चिनी औषधे व बुलेट प्रुफ जॅकेटसाठी जगभर त्याची हत्या होत आहे. ही प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आढळणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण कोकणात त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. खवले असलेला एकमेव सस्तन प्राणी मुंगुसासारखा दिसणारा पण खवले असणारा हा प्राणी साधारणत: सर्व प्रकारच्या जंगलात आढळतो. फेलिडोटा कुटुंबातील हा प्राणी असून, तो निशाचर आहे. तो मांसाहारी वर्गातील असून वाळवी, मुंग्या व वारुळात राहणारे इतर जीव हे त्याचे मुख्य खाद्य असते. खवले मांजराला दात नसल्यामुळे ते खाण्यासाठी १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग करते. खवले मांजर वर्षभरात ७० ते ८० कोटी किडे वर्षभरात खाते आणि निसर्गचक्राचा तोल सांभाळते.
खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.
खवल्या मांजराचे वजन : ८ ते ३५ किलोपर्यंत असते.
भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. धोक्याची जाणीव होताच खवले मांजर स्वत:च्या शरीराचा गोल भाग करून घेते. यामुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते.भारतात दोन प्रजाती खवले मांजराच्या, अशिया खंडात चार आणि आफ्रिकेत चार अशा आठ प्रजाती सापडल्या आहेत.
भारतीय खवले मांजर हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर, पाकिस्तान व श्रीलंकेत आढळते. तसेच पाकिस्तान, श्रीलंकेत आढळते, तर चिनी प्रजाती हिमालय, आसाम, नेपाळ, ब्रह्मदेश, दक्षिण चीनमध्ये आढळते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: अन्सार खान.
पुणे.
Leave a Reply