नवीन लेखन...

जागतिक मुद्रणदिन

२४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

मुद्रण कलेचा जनक असे ज्याला संबोधले जाते तो योहानेस गुटेनबर्ग, त्यांचा जन्मदिन म्हणजे मुद्रण दिन होय…

इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात चीनी लोकांनी मुद्रणाची पद्धत शोधली. त्या पद्धतीत लागणारी उपकरणे म्हणजे कागद, शाई आणि मुद्रणप्रति मुद्रण प्रतिमा ही कोरून तयार केलेल्या पृष्ठाची असे. त्या काळात काही मजकूर (बौद्ध धर्मातील काही विचार) संगमरवरी (दगडी) खांबावर कोरून ठेवलेले असत. जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत. या गोष्टीवरून चीनी लोकांना मुद्रणप्रतिमेद्वारा प्रिंटिंगचे तंत्र सापडले. सहाव्या शतकानंतर मात्र त्या संगमरवरी दगडाची जागा लाकडाने घेतली. कारण दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणं जास्त सोपं आहे सोयीस्कर होत. इ. स. १०४१-४८ या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी किमयागाराने मुद्रणासाठी चल (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणाऱ्या) खिळ्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केले.

मुद्रणाच्या कलेतील मोलाचा दगड म्हणजे १४३४ ते १४३९ हा काळ… या काळात जर्मनीतील र्हारईनलँडमध्ये योहान गूटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण नावाचा प्रकार शोधला… असं म्हटलं जातं की तो प्रकार या आधीही अस्तित्वात होता, मात्र असे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. गुटेनबर्ग याने मुद्रा, मातृका व शिशाचा संयुक्त उपयोग करून टिकाऊ अशी अक्षरे (सुटी) मोठ्या संख्येने तयार करणे व प्रत्येक अक्षर (एकाच अक्षराचे सर्व नमुने) दिसायला सारखे निर्माण केले.. या प्रकारचे मुद्रण-तंत्र वापरून गुटेनबर्ग याने ४० पानांचे बायबल छापले. गुटेनबर्ग यांचा मूळ व्यवसाय चांदीच्या कारागिराचा होता. त्यांनी योहान फूस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे जो मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला त्यामध्ये त्यांनी फक्त आराखडा तयार करणारा भागीदार म्हणून काम केले. १४५५ साली गुटेनबर्ग यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावला. या मुद्रण पद्धतीपासून मुद्रणाला लागणाऱ्या कालावधीत खूप प्रमाणात घट झाली. इ. स. १४७५ च्या सुमाराला अक्षरांच्या पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचली. त्याआधी नरम धातूच्या मुद्रा वापरल्या जात. पेटर शफर यांनी पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचविली.

यानंतर पुढे ३५० वर्ष या मुद्रण कलेत अनेक बदल, सुधारणा झाल्या… १५५० च्या सुमाराला लाकडी मळसूत्राची जागा लोखंडी मळसूत्राने घेतली. त्यानंतर वीस वर्षांनी संशोधकांनी दुहेरी बिजागरीच्या सहाय्याने लोखंडी चौकट हलविण्याची सोय, फक्त अक्षरांच्या खिळ्यांवर शाई लावून उरलेल्या भागावरील शाई कागदावर उतरू नये म्हणून एक कातडी आवरण, दाब समान देण्यासाठी एक कापडी जाड थराची गादी वगैरे सुधारणा केल्या. साधारण १६२० च्या सुमाराला अॅरमस्टरडॅम येथे यंत्राचा पाटा आपोआप वर उचलला जावा म्हणून पाट्यावर दाब देण्यासाठी जी एक पट्टी वापरली जात असे त्या पट्टीला प्रतिभार लावण्याची (समतोल राखण्यासाठी दुसरे वजन लावण्याची) सोय करण्यात आली. या यंत्राला ‘डच मुद्रणयंत्र’ असे नाव मिळाले व हेच यंत्र १६३८ मध्ये उत्तर अमेरिकेमध्ये प्रचारात आणले गेले. या सुधारणेचे जनक व्हिलेम यान्सन ब्लाऊ हे समजले जातात. १७९० च्या सुमाराला विल्यम निकलसन या इंग्रज वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी खिळ्यांवर शाई लावण्यासाठी कातडी आवरणाचा एक रूळ तयार करून तो वापरायला सुरुवात केली. यामुळे अशा यंत्रावर प्रथम चक्रीयगतीचा उपयोग केला गेला. कातडी आवरणाच्या ऐवजी नंतर सरस आणि मोलॅसिस (ऊसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी तयार करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाचा उपयोग रूळ करण्यासाठी करण्यात आला. इंग्लंडमध्ये १७९५ मध्ये प्रथमतः धातूचा उपयोग केलेले मुद्रणयंत्र तयार करण्यात आले. काही वर्षांनी अमेरिकेतील एका यंत्रज्ञाने एक धातूचे यंत्र तयार केले, त्यात मळसूत्राचा उपयोग करण्याऐवजी सलग अशा धातूच्या यांत्रिक सांध्यांचा उपयोग केला होता. या यंत्राचे नाव ‘कोलंबियन‘ असे होते. नंतर सॅम्यूएल रस्ट यांनी ‘वॉशिंग्टन’ नावाचे यंत्र तयार केले. त्याचा ताशी वेग सु. २५० कागदांचा (प्रतींचा) होता.

पॅरिसमध्ये १७९० च्या सुमाराला स्टीरिओ टाइपचा उपयोग यशस्वीरित्या केला. स्टीरिओ टाइपचा एक निराळा प्रकार म्हणून १८४८ नंतर विद्युत विलेपन करण्याच्या पद्धतीने हे तंत्र वेगळ्या स्वरूपात वापरले गेले. अमेरिकेत ‘लिबर्टी’ नावाच्या एका यंत्राची रचना १८५७ मध्ये केली गेली होती. या यंत्रात पाट्याची हालचाल यांत्रिकपणे होत असे व पायाने एक दांडी दाबून धरली की, गादीच्या पृष्ठावर पाटा दाबून धरला जात असे. १८६५ मध्ये अमेरिकेमध्ये विल्यम बुलक यांनी प्रथम कागदाची रिळे यंत्रावर लावून छपाई करण्यासाठी अखंड चक्रीय गतीच्या पद्धतीचे यंत्र तयार केले. या यंत्रावर मुद्रणानंतर कागद कापण्याची योजना अंतर्भूत होती व तासाला पूर्ण वर्तमानपत्राच्या १२,००० प्रतींची छपाई करण्याची क्षमता या यंत्रात होती; १८७० नंतर याच यंत्रात स्वयंचलित घड्या घालणारे मशीन नव्याने घालण्यात आले. १८८० नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाइप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले. अमेरिकेत १८८५ मध्ये टॉलबर्ट लॅन्स्टन यांनी ‘मोनोटाइप’या अक्षरजुळणी यंत्राचा शोध लावला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रतिरूप (ऑफसेट) मुद्रणाची सुरुवात झाली. इ. स. १९०४ च्या सुमाराला अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील नट्ली येथे आय्. डब्ल्यू. रूबेल या मुद्रकांनी चुकून दाब देणाऱ्या रबरी पृष्ठावर मुद्रण केले आणि गंमत म्हणजे ते प्रिंटिंग एवढं गुणवत्तापूर्ण होत की तेव्हापासून ही चूक नेहमी व्हायला लागली. १९२९ मध्ये अमेरिकेत दूरस्थ नियंत्रणाने अक्षरनिर्मिती यंत्राच्या साह्याने जी अक्षरनिर्मिती सुरू झाली त्यामुळे मानवी श्रमाशिवाय किती काम होऊ शकते ते समजले. इ. स. १९५० नंतर बी. बी. आर. पद्धतीने कार्यक्रमीत अक्षर जुळणीचे तंत्र सुरू झाले. १९६४ साली प्रथमच जपानमध्ये मैनिशी शिंबून या वर्तमानपत्राने याबाबतीत प्रयोग करून पाहिला. क्ष किरण नलिकेच्या पडद्यावर वर्तमानपत्राच्या सबंध पानाची प्रतिमा प्रथम जुळवून दूरचित्रवाणीप्रमाणे रेडिओ तरंगांद्वारा त्याचे प्रेषण करण्यात आले. यानंतर काहीच दिवसात संगणकावरून कमांड देऊन मुद्रणाचे तंत्र विकसित झाले आणि मुद्रण अतिशय सोप्या आणि कमी वेळात पूर्ण होणार झाले. इथून पुढचा विकास आपल्या डोळ्यासमोरच झालाय.

हा मुद्रणाचा विकास होत असतानाच संगणक नावाच्या यंत्राचा प्रवेश मानवाच्या आयुष्यात झाला. संगणकाच्या विकासासोबतच इंटरनेटचं आगमन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..