‘जागतिक कडधान्य दिन’ पहिल्यांदा २०१६ मध्ये साजरा करण्यात आला, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आजच्या जीवनशैलीत लोक फास्ट फूड आणि फ्रोझन फूडला जास्त महत्त्व देत आहेत. त्यामुळं आपल्या आहारात डाळींचा वापर कमी होत आहे. त्यामुळं शरीराला पूर्ण पोषण मिळत नसून त्याचे दुष्परिणाम लोकांच्या विशेषत: लहान मुलं व तरुणांच्या आरोग्यावर होत आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी आणि अन्नसुरक्षेसाठी डाळी किती महत्त्वाच्या आहेत, ही बाब लोकांपर्यंत पोहोचावी आणि डाळींचा आहारात समावेश करण्यासाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो.
जी धान्यं द्विटल असतात म्हणजे बियांमध्ये दोन भाग असतात, ज्यापासून डाळी तयार होतात त्यांना कडधान्य म्हणतात. मूग, मटकी, मसूर, उडीद, तूर, हरभरा, राजमा, वाटाणा, कुळिथ यांसारख्या अनेक प्रकारच्या कडधान्यांचा यात समावेश होतो. या कडधान्यांना प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आहारात विविध प्रकारच्या कडधान्यांचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. विशेष म्हणजे शिजवल्यानंतरही या कडधान्यांमधील पौष्टिक घटक सुरक्षित राहतात.कडधान्ये कोरडवाहू आणि पावसाच्या प्रदेशात घेता येतात. हे जमिनीतील नायट्रोजनचे संरक्षण करून जमिनीची सुपीकता सुधारते, त्यामुळे खतांची गरज कमी होते आणि त्यामुळे ग्रीन हाउसमधील वायूंचे उत्सर्जन कमी होते. पिवळ्या मूग डाळीमध्ये प्रथिने, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असलेल्या या मसूरमध्ये फॅट अजिबात नसते.भारत हा जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक देश आहे आणि त्याचा सर्वाधिक वापरही होतो. भारताची वार्षिक डाळींची मागणी सुमारे 250 लाख मेट्रिक टन आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply