जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक अमेरिकन इंजिनिअर सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
तयार कपड्यांच्या जगात मागे पडत चाललेल्या असंघटित टेलरिंग क्षेत्रात कौशल्याचे बीज रोवले जात आहे. आपल्या देशात १० लाखांवर टेलर्स आहेत. शिंपी किंवा दर्जी किंवा टेलर, शिवणकाम महत्त्वाचा व्यवसाय रेडिमेडच्या काळात अडचणींचा सामना करीत आहे. लोक हल्ली कापड विकत घेऊन शिंप्याकडून ते शिवून घेण्याऐवजी तयार कपडे विकत घेताना दिसतात.त्यामुळे शिंप्यांचे काम रफ्फू करणे, बटणे लावणे, उसवलेले शिवून देणे, चेन बसविणे एवढेच राहिले आहे.अत्याधुनिक यंत्रांची कमतरता, नवनव्या स्टाइल व ट्रेंड्स जाणून घेण्यासंबंधी जागरूकतेचा अभाव व संसाधनांचा तुटवडा यामुळेच टेलर्स अडचणीत आले आहेत. हे क्षेत्र संघटितही नाही. त्यामुळे या व्यवसायाला कौशल्य मिळवून देण्यासाठी रेमण्ड समूह पुढाकार घेत असतो. जागतिक स्तरावर दर दोन वर्षांनी स्टाइल मास्टर टेलर्सची स्पर्धा होते. होव यांनी १७९० मध्ये या यंत्राचा अमेरिकेत शोध लावला, तर १९२७ मध्ये ‘टेलर’ हा शब्द हॉवर्ड विद्यापीठाने डिक्शनरीत आणला.
चिन्मय काळे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply