१९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्व दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.
जॉन लॉगी बेअर्डने १९२५ साली टेलिव्हिजनचा शोध लावला, तेव्हा प्राथमिक अवस्थेतील दूरदर्शनचा वापर शिक्षण, मनोरंजन नि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित होता. टेलिव्हिजन शब्दाची उत्पत्ती ग्रीक व लॅटीन या दोन भाषांतील शब्दांचे एकत्रीकरण होऊन झाली आहे. ‘टेली’ या ग्रीक शब्दाचा अर्थ दूरचे तर व्हिजिओ या लॅटीन शब्दाचा अर्थ दृष्टी. त्यावरून दूरचं दाखविणारा तो टेलिव्हिजनचा खोका होय.
टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून तो घरेदारे, कार्यालये, सार्वजनिक संस्था या ठिकाणी आपले स्थान हक्काने पटकावून बसला आहे. अलिकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सी.सी.टी.व्ही.) हा अवतारदेखील सार्वजनिक ठिकाणी, उद्योगक्षेत्रात, मॉलमध्ये सर्रासपणे वापरला जात आहे.
प्रारंभीचा टेलिव्हिजनचा अवतार हा यांत्रिक स्वरुपाचा होता व तो सेलेनियम या धातूच्या फोटो कंडक्टिव्हिटी तत्त्वावर आधारीत होता. विलो- – स्मिथ नावाच्या तंत्रज्ञाने १८७३ साली तो शोधून काढला होता. १८८४ मध्ये जर्मनीतील पॉल गॉटलिब निपकोन याने स्कॅनिंग डिस्क शोधून काढली व त्या मॉडेलमध्ये सुधारणा केली होती. मात्र १९२५ च्या सुमारास जॉन लॉगी बेअर्ड याने या यांत्रिक खोक्यात फिरत्या प्रतिमा दाखविल्या व तोच तो खरा टेलिव्हिजन ठरला. अर्थात त्यात इलेक्ट्रोनिक्स क्रांतीनुसार उत्क्रांती होत गेली हेही तितकेच खरे आहे. ही क्रांती १९३५ पूर्वीची, १९३५ ते १९४१, दुसरे महायुद्ध, १९४६ ते १९४९, १९५० ते १९५९, १९६०-२००० अशा टप्प्यात होत गेली.
आज तर टी.व्ही. कुटुंबाचा घटक बनून गेला आहे. दूरदर्शनमुळे वाचनसंस्कृती लयास गेली असा दोषारोप केला जातो.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply