व्हेगन डायट. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता.
१९२० साली महात्मा गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील ‘व्हेजिटेरियन सोसायटी’ समोर दिल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि या शाकाहारापलीकडं ‘व्हेगन’ असा वर्ग जन्माला आला. ही मंडळी दुध अंड्याबरोबरच जिलेटिनमध्ये प्राणिजन्य घटक असल्यानं त्याचा समावेश असलेले जेली वा इतर गोड पदार्थही व्हेगन लोक खात नाहीत. मधाचे सेवनही करत नाहीत. यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प, कोकोनट आणि अल्मन्ड मिल्क सुरु झाले तर लोण्याचा पर्याय म्हणून व्हेगन मेयोनीज आले. चीझ वा पनीरच्या जागी टोफू आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे सुरु झाले.
आज या आहाराचा इतका बोलबाला झाला आहे की जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याची भलामण करताना दिसतात. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व अनेक क्रिकेट स्टारही व्हेगन डायट करत आहेत. आता जागोजागी व्हेगन सोसायटी जन्माला आल्या आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply