पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बचत ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा ‘जागतिक जल दिन’ म्हणून निश्चित करण्यावत आला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा ‘जागतिक जल दिन’ म्हणूनही साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रियो डि जेनेरियो’मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरुकता करणे हा प्रमुख उद्देश या मागे आहे. पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. पाणी टंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे तसेच माणसाच्या आत्म्याला लागणारी तहान भागवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.
जगातील ८० पेक्षा कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्याप मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल. कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने जागतिक जल दिनानिमित्त दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे.
२०२५ पर्यंत जगातील एक तृतिअंश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. नद्यांचा प्रवाह आणि पाणी वाटपावरून भारत, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply