मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात २० मे १७३४ रोजी एका मधमाशीपालकाच्या कुटूंबात ‘एन्टोन जान्सा’ या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला.
त्यांनी १७६६ मध्ये युरोपातील पहिले मधमाशी शिक्षण केंद्र सुरू केले व १७७१ मध्ये त्यांनी मधमाशी पालनावरील पहिले पुस्तक प्रसिध्द केले. १७७३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाच्या जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्य मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. जागतिक मधमाशी दिवस प्रकल्पाचे प्रमुख आणि प्रजासत्ताक स्लोव्हेनियाचे उपपंतप्रधान डेजान झिदान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सादर केलेल्या ठरावास ११५ देशांचा पाठिंबा मिळाला. मधमाशी संरक्षणासाठी सर्व देशांनी जनजागृतीची मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले यानुसार दर वर्षी २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून २०१८ पासून साजरा केला जावु लागला.
मधाचा अनेक पदार्थात वापर करण्यात येतो. मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधाला पृथ्वीतलावरील अमृत असे संबोधले जाते. कारण मध हे पृथ्वीवरील सर्वात गोड वस्तू व अत्यंत स्वादिष्ट असून ‘सुरक्षित अन्न व औषध’ म्हणून श्रेष्ठ आहे.
आपल्या स्वयंपाकघरातील फ्रीज मध्ये मधाची बाटली नक्की असेल आणि नसेल तर हा नक्की तुमच्या घरात मधाची बाटली ठेवा. शुद्ध मध लवकर खराब होत नाही, तरी पण आज बाजारामध्ये अनेक मधाचे हजारो ब्रॅण्ड आहेत आणि प्रत्येक ब्रॅण्ड आपला मध किती शुद्ध आहे आणि किती नैसर्गिक आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.
मधाची निर्मिती करण्यासाठी मधमाश्या त्यांचे पूर्ण आयुष्य खर्ची घालतात. मधमाश्याप फुलांमधून परागकण गोळा करतात व पोळ्यांमध्ये साठवतात. मधकोशात साठवून ठेवलेल्या या परागकणांमधून मध तयार होते. मधकोशात साठवून मध अधिकच घट्ट होत जाते. पोळ्यामधून काढलेल्या मधामध्ये थोड्या प्रमाणात मेणाचा अंशही असतो. कारण त्याद्वारे मधमाश्या मधाचे रक्षण करतात. पोळ्यातून मध काढण्याची प्रक्रिया अतिशय सावधानपूर्वक व स्वच्छतेचे नियम पाळून करावी लागते.
नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही.
मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे. हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो. मधाचे सेवन केल्यावर चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते. पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल. रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे. टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो. मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो. मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.
पण आजकाल बाजारात विविध कंपन्यांचे मध उपलब्ध असल्याने मधात भेसळ होण्याची शक्यतादेखील अधिक आहे. आणि ही भेसळ डोळ्यांना दिसणे किंवा फक्त जिभेच्या चावीने समजू शकणार नाही. मग तुम्ही घेतलेले मध भेसळयुक्त तर नाही ना ? हे ओळखण्यासाठी या काही गोष्टी आपण जरूर तपासून पहाणे गरजेचे आहे.
क्रिस्टलायझेशन.
मध तयार होताना, त्यातील पाण्याचा अंश कमी होत जातो व मध अधिक घट्ट होते. नैसर्गिक मध हा हवेतील तापमान कमी होऊन गारवा वाढल्यास कणीदार होऊ शकतो व असे झाल्यास मधाची बाटली सुर्यप्रकाशात ठेवणे किंवा गरम पाण्यात ठेवणे यासारखे उपाय करता येतात. मध जरी कणीदार झाला तरी त्याच्या औषधी गुणधर्मात व दर्जात कोणताही फरक पडत नाही. मात्र जर मधात भेसळ केली असेल तर ते पातळ असल्याने तसे दिसणार नाही. म्हणून मध घेतानाच तुम्ही ही काळजी घ्या. शुद्ध मध पाण्यात विरघळत नाही.
शुद्ध स्वरूपातील मध हे घट्ट व चिकट असते. त्यामुळे ते पाण्यात पटकन मिसळत नाही. जर तुम्ही ग्लासभर थंड पाण्यात मध टाकल्यास ते सर्वात आधी ग्लासाच्या तळाशी स्थिरावेल. व पाण्यात मिसळण्यासाठी ते ढवळावे लागेल. जर मध भेसळयुक्त असेल तर न ढवळता मध पाण्यात एकत्र होईल.
पेपर टेस्ट.
मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे जाणण्यासाठीचा एक सोपा मार्ग म्हणजे , पेपर टेस्ट ! मधाचा थेंब कागदावर टाका. व तो काही काळ राहू द्या. जर मध शुद्ध असेल तर तो कागद भिजणार नाही. कारण शुद्ध मधात पाण्याचा अंश अत्यल्प असतो. मात्र भेसळयुक्त मधाचा कागद भिजतो.
फिंगर टेस्ट.
मधातील भेसळ ओळखण्यासाठी, फिंगर टेस्ट केली जाते. मात्र ती व्यक्तीसापेक्ष असते. पण तुम्ही ती करून पाहू शकता. तर्जनी आणि अंगठ्यामध्ये मध घेऊन काही वेळ घासा. हळूहळू मध बोटामध्ये जिरेल. व उरलेले मध तुम्हाला बोटावर चिकट नाही वाटणार. जर हेच मध भेसळयुक्त असेल तर ते तुम्हाला चिकट वाटेल. कारण भेसळयुक्त मधात साखर असते.
अस्सल मधात पाण्याचा अंश नसल्याने, मधात बुडवलेला कापसाचा गोळा जर पेटवला तर तो आवाज न करता पेटतो. आणि जर तडतड आवाज झाला, तर ते मध भेसळयुक्त आहे हे स्पष्ट होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply