रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे म्हणजेच ‘ रँग्लर परांजपे ‘ यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. रघुनाथराव हे पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. त्यावेळच्या हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन रॅंग्लर परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ ट्रायपॉस ‘ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँग्लर हा किताब पटकावणारे ते पहिले भारतीय होते . रँग्लर परांजपे हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी पुणे विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषवले , तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले. १९०२ ते १९२७ या काळात रँग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रँग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रँग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरूपद रँग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रँग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनतर दि. २९ सप्टेंबर १८८४ विजयादशमीच्या मुहूर्तावर गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते ‘ हायस्कूल फोर नेटिव्ह गर्ल्स ’ संस्थेचे उदघाटन झाले. दि. २ ऑक्टोबर १८८४ पासून वाळवेकर वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. १७ नोव्हेंबर १८८४ मध्ये किबे वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. ४ मार्च १८८५ रोजी सांगलीचे श्रीमंत तात्यासाहेब पटवर्धन यांच्या मालकीच्या ‘हुजूरपागा’ या वास्तूत शाळेच्या इमारतीची कोनशिला सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते बसविण्यात आली. काही वर्षाने त्यासाठी रँग्लर परांजपे यांनी प्राथमिक विभाग सुरु करण्यासाठी त्याकाळी पाच हजार रुपये देणगी दिली.
रॅंग्लर परांजपे यांची स्वाक्षरी माझ्या एका चाहत्याने मला एका कार्यक्रमात आणून दिली , ती स्वाक्षरी त्याच्या आजोबांनी घेतली होती. नाहीतर मला ही स्वाक्षरी कुठून मिळणार ? , दुर्देवाने मला त्या चाहत्यांचे नाव आज आठवत नाही.
रॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत. रॅंग्लर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे ह्यांनी कुटुंब नियोजन क्षेत्रात खूप काम केले त्याबद्दल भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्या काही काळ राज्यसभेवर होत्या . त्याचप्रमाणे त्यानी १९३३ ते १९५५ पर्यंत काही चित्रपटात भूमिकाही केल्या होता. शकुंतला परांजपे ह्यांचे शिक्षण केंब्रिज मध्ये झालेले होते आणि त्यांचे फ्रेंचसह अनेक भाषांवर प्रभुत्व होते. रॅंग्लर परांजपे याची नात सई परांजपे यांना त्याच्या चित्रपट दिग्दर्शन आणि पटकथा लेखन यासाठी पद्मभूषण देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता . सुप्रसिद्ध फोटोग्राफर हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर यांनी १९०२ मध्ये ‘ सर रँग्लर मि. आर. पी. परांजपे ‘ नावाची त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवली होती.
रँग्लर परांजपे यांचे १९६१ साली ‘ एटीफोर नॉट आऊट ‘ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले .
६ मे १९६६ रोजी वृद्धापकाळाने रँग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply