हा सांधा खूपच गुंतागुंतीचा आहे. कारण माणसाला आपल्या हाताची निरनिराळी निपुण हालचाल करण्यासाठी या सांध्याचा उपयोग होतो. मनगटाजवळ ३६०० वर्तुळाकार हालचाली झाल्याने हात उलथा आणि पालथा होऊ शकतो. तसेच हातात काहीही पकडण्यासाठी ४५० वरच्या बाजूला व एखादी गोष्ट टेबलवरून उचलण्यासाठी २५-३०० हात खाकी- या सांध्यातून आपल्याला हलविता येतो अशा रितीने हाताच्या सर्व निपुण हालचाली होण्यासाठी मनगटाचा सांधा १०० टक्के फिट असावा लागतो.
हा सांधा वरच्या बाजूस रेडीयस आणि अल्ना या दोन हाडात व खालच्या बाजूस मुख्यत्वे ल्युनेट, स्कॅफॉईड व | ट्रायक्वेटरम या छोट्या हाडात तयार होतो.
एवढ्या सर्व हाडांना व्यवस्थित बांधण्यासाठी सर्व बाजूंनी अनेक लिगामेंटची रचना केलेली आहे. याच सांध्यात रेडीयस आणि अल्ना या दोन हाडातील छोट्या सांध्याचा अंतर्भाव होतो.
अल्ना हे हाड रेडीयस या हाडाच्या मागे १ सें.मी. बांधले असल्याने या सांध्यात एका कास्थिचा व श्वास दोन लिगामेंटचा उपयोग केलेला आहे.
आजमितीला या सांध्यातील प्रत्येक भागाचे निरनिराळ्या महत्त्व प्रयोगाने सिद्ध झाल्यामुळे मनगटाच्या सांध्याच्या दुखण्याने निदान करणे डॉक्टरांना शक्य झाले आहे. यात क्ष-किरण, सीटीस्कॅन, एम.आर.आय. स्कॅन, ऑथ्रोस्कोपी या तपासणींचा सिंहाचा वाटा आहे.
प्रत्येक सांध्याप्रमाणे याही सांध्यात वंगण तयार करणाऱ्या ग्रंथीचा संच असतोच. पण या ग्रंथींना होणाऱ्या रोगामुळे उदा. सांधेदुखी, टीबी. हा सांधा दुखू लागतो व त्याची हालचाल कमी होते.
हा सांधा त्वचेच्या खालीच असल्याने व रोजच उपयोगात असल्याने याची दुखणी रुग्णांच्या लवकर लक्षात येतात व ते योग्य वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतात. त्यामुळे डॉक्टरांनाही लवकर निदान करून त्याचे निरुपण करणे शक्य होते.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply