या भवंसागरातुनी,तारीशी ना रे कान्हा,
भोवती निळ्या आभाळी,
तूच भासशी राणा,–!!!
संसारसागरात भटकती,
अनेक हतबल जीव ना,–?
हात त्यांना नकळत देशी,
करत आपला जादूटोणा,–!!!
सागरी या सुखकमळे फुलली,
मोहक वाटती, गुलाबी रंगा,
दर्शन त्यांचे अधुनी -मधुनी,
फक्त पाठ राख श्रीरंगा,–!!!
भासतसे सुख फुले उमलली, क्षणभंगुर या जीवना,
उमलून फुलती ,कोमेजती,
शेवट ठेवती मात्र तरंगा,–!!!
अदृश्य ही नाव चालली,
काय करावे या हेलकाव्यां,
तना- मनाचा कान करुनी,
ऐकते फक्त तुझ्या पाव्यां,–!!!
वरून पाहते प्रतिमा माझी,
जशी पुढे–पुढे चालता,
जीवन नौका अखंड प्रवासी, निधान तूंच, – तूंच, त्राता,–!!!
एकात्म होऊन मुरारीशी,
अर्पण करते त्याला आत्मा,
केवळ तूच या हृदयी,—
तूंच असशी परमात्मा–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply