नवीन लेखन...

या ज्येष्ठांना एक सलाम

गेल्या महिन्याभरात मला काही सामुहीक कार्यक्रम बघता आले. काही कार्यक्रमांमध्ये माझ्या आसपासची मंडळी कार्यरत होती. कुणी पडद्यामागे, तर कुणी स्टेजवर. यातले बऱ्यापैकी कार्यक्रम छोटेखानी, म्हणजे त्यांच्या बिल्डींगपुरते, काही विशिष्ट communityसाठी असे होते. इतर काही सामुहीक सुद्धा होते, जे सर्वांसाठी खुले तर होते, निःशुल्क देखिल होते; पण तिथे आवडी-सवडीने जाणाऱ्यांची संख्या मात्र कमी होती.

या सर्वांमध्ये एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने भावली, ती म्हणजे तिथले सादरकर्ते. मला वाटतं, कार्यक्रम छोटा असो वा मोठा; त्यातल्या कलाकारांचं वय, स्थळ, budget, या सगळ्यापेक्षा matter करतं तिथल्या सादरकर्त्यांचं spirit! Celebrity पदाला न पोचलेले लोक जेंव्हा भरपूर परिश्रमाने, सामुहीकरित्या एकत्र येऊन एखाद्या उत्सवाच्या पूर्णत्वासाठी झटतात, तेंव्हा तिथली कार्य-शक्ती, ऊर्जा, आणि या सगळ्यातून प्रत्येकाच्या वाटेला येणारा अनुभव आणि आनंद अगणित असतो. तो कार्यक्रम त्या कुणा एकाचा नसून, त्यातल्या प्रत्येकाचा असतो, आणि ती जाणीव त्यात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाची असते. त्यामुळे छोट्या-मोठ्या उणिवांकडे, मानापमानाकडे जास्त लक्ष न देता, सारे त्यातला आनंद लुटण्यात मग्न असतात. ह्यात अलिकडे भरपूर सहभाग ज्येष्ठ कलाकारांचा देखिल असतो बरं का! म्हणजे मी लहानपणी पाहिलेल्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ मंडळी तीच सहभागी असायची, ज्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव असायचा. आताशा नवशिकी ज्येष्ठ मंडळी सुद्धा भरपूर उत्साहाने विवीध classes join करून, जोशात अभ्यास करून कित्येक परीक्षा देतात, कार्यक्रमांत सहभागी होतात, त्यांचं प्रचंड कौतुक वाटतं मला. उदाहरणार्थ गीताधर्म मंडळाच्या, तसेच संस्कृत भारतीच्या स्पर्धा आणि परीक्षा. सामुहीक गणेशोत्सवातल्या, कुठल्या कुठल्या महिला मंडळांच्या, बचत गटांच्या देखिल अनेक स्तरांवर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा. अशा ठिकाणी केवढे तरी talent hunt programs घेतले जातात. नव्या कलागुणांना, कलाकारांना संधी मिळते, अजून शिकण्यासाठी प्रेरणा दिली जाते.

काही (असामान्य) करण्याची, नवनवीन गोष्टी शिकत, स्वतःला समृद्ध करत राहण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा, त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक तडजोड, आणि आपल्या (अविश्रांत) जबाबदाऱ्यांमधून घेतलेली (तात्पुरती का होईना) जाणीवपूर्वक निवृत्ती. हे सगळं खूप खूप जास्त matter करतं जेव्हा सादरकर्ते ‘बाल’ नसतात. लहानपणी जमलं नाही तरी काय झालं, आयुष्यात जेंव्हा मला वेळ मिळतोय, सवड काढता येतेय, तेंव्हा तेंव्हा मी स्वतःसाठी झटेन, ही अत्यंत आदर्श बाब वाटते मला! कारण त्यासाठी त्यांना कित्येक निवांत क्षण अर्पण करावे लागलेले असतात. अपरिहार्य जागरणं वाट्याला आलेली असतात. घरच्यांकडे लक्ष न पुरविल्यामुळे वाट्याला येणारा रोष, टोमणे, मस्करी, सारं दुर्लक्षून वाट चालत राहावी लागते. घरच्या छोट्यांना हौसेने मोठी मंडळी क्लासला पाठवत असतात. त्या उलट आपल्या ज्येष्ठांचं हे extra काहीतरी शिकणं, वाव मिळाल्यास perform करणं, ही फक्त त्या व्यक्तीची स्वतःचीच गरज असते. त्यामुळे, त्यासाठी घरातलं, किंवा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणचंसुद्धा कुणीही काहीच compromise करणार नसतं, की मदतीलाही येणार नसतं. त्यामुळे (निदान) आवश्यक त्या जबाबदाऱ्या पार पाडून, आपला patience कायम ठेवून, ह्या hobbyसाठी त्यांना वेळ काढावा लागतो.

त्यातूनही आजकाल बरीच वयस्कर मंडळीसुद्धा नवनवीन काही शिकताना, perform करताना दिसतात. त्यांच्या विशेष कौतुकाचं कारण म्हणजे, त्यांची शारीरिक क्षमता. सरावासाठी लागणारी मेहनत करण्याकरिता निश्चितच त्यांना मानसिक ताकद वाढवावी लागते. तसंच नवीन शिकताना ‘मला काही येत नाही’ हे मान्य करून लहान वयाच्या शिक्षकांचे धडे, झाल्यास बोलणी ऐकून घ्यावी लागतात! काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या नसतात किंवा कमी झालेल्या असतात. तरीही आयुष्यात मिळालेल्या ह्या निवांतपणाचा त्यांनी आरामाव्यतिरिक्त केलेला सकारात्मक उपयोग, हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. अजून एक खेदाची गोष्ट म्हणजे, लहान मुलांएवढं कौतुक ह्यांचं नक्कीच होणार नसतं. किंवा आज शिकलेत तर ह्याचा करियरला उपयोग होईल, उद्या घरच्यांना नावलौकिक मिळेल, हे देखिल होणं नसतं. किंवा हे perform करणार आहेत म्हणून बाहेर कुणी मोठी पब्लिसिटी करेल, तर ते ही व्हायचं नशीब सगळ्यांचं असतंच असं नाही. म्हणजे मी हे करतोय त्याच्या मेहेनतीबरोबरच त्याचं कौतुक, आणि आनंदही सर्वात जास्त माझा मलाच असणार आहे, हे सुद्धा अगदी गृहीत असतं. म्हणूनच ह्यांच्या स्पिरिटला जबरदस्त सलाम करावासा वाटतो मला.
ह्या सर्वांना एकदा सांगायचंय, की तुमच्यामुळे जीवन आशावादी आणि प्रेरणादायी आहे, आणि तुमच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करता यावो, मनासारखा अभ्यास करता येवो, सादरीकरणाला भरपूर संधी उपलब्ध होवो, आणि त्यायोगे होणारी सरस्वतीची सेवा अशीच घडत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

— प्रज्ञा वझे घारपुरे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..