या वळणावर
खुप हुंदडलो
बहुत बागडलो
मनमानी जगलो
लाडाकोडात वाढलो
*बालपण*
या वळणावर
थोडा शिस्तिचा बडगा
झालो थोडा मी कोडगा
अभ्यासाचा असे तगादा
काय करू आता सांगा
*कौमार्यपण*
या वळणावर
मौज मस्ती व्याख्या बदलली
यौवनाची नशा चढली
स्वतंत्रतेची बाधा जडली
*तारुण्यपण*
या वळणावर
सारी नशा उतरली
लग्नबेडी पायी आली
संसारी खेळी चालली
जबाबदारीने कंबरडे वाकली
*प्रौढपण*
या वळणावर
संपल्या जबाबदाऱ्या
चला करू आता मौजमजा
कसले काय…….
आजारपणात देह गांजला
दवाखान्याची पायरी चढताच खिसा फाटला
*म्हातारपण*
या वळणावर
शिणला हा देह
आधी-व्याधीने
मरणासन्न देहास
वेध लागले मृत्यूचे
धिंडवडे ओल्या देहाचे
*आजारपण*
या वळणावर
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply