या सांजराई मी माझ्या
डोकावलो जरा भूतकाळी.
आठवले अर्ध्यात सोडून गेलेले बाबा आणि आई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
बाल सवंगडी
वरच्या आळीचे बंडू व माझी ताई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या
सांजराई..
मी सगळ्यात लहानगा
दोन भावंडांत मोठा माझा भाई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
गावची कौलारू शाळा
मित्र, गुरुजी आणि शाळेतल्या बाई,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
पडली जबाबदारी
प्रपंचासाठी हाल अपेष्टा बरेच काही,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
किती झिजलो किती कष्ट
कधी सुख कधी दु:ख
भरेल त्याची एक मोठी वही,
आठवण त्यांची मज येई
आजही आयुष्याच्या या सांजराई..
या सांजराई.. या सांजराई..
कवी.
शिव सह्याद्री.
– नंदकुमार स.गोपाळे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply