नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग २२

पाणी शुद्धीकरण भाग दोन

पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, “पाणी शुद्ध कसे करा” हे मात्र सांगितले जात नाही. “इट इज नाॅट अवर बिझनेस” असं म्हटलं की विषय संपत नाही राव !

आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे केले जातेय का ? कसे करायचे हे सुस्पष्ट सांगितले जातेय का ?

परदेशी टेक्नाॅलाॅजी वापरून पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग, त्यातील पारदर्शकता अजूनही स्पष्ट होत नाही. एखादी कंपनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जावून एकमेकांच्या जाहीरातींशी जणुकाही स्पर्धाच करत असतात. मग त्यातील खरेखोटेपणा कसा तपासणार ?

शेवटी जो दुसऱ्यावरी अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे !

पाणी शुद्ध करण्यासाठी अस्सल भारतीय पद्धतींचा अभ्यासच होत नाहीये, या निमित्ताने आपण एक जल शुद्धीकरण मोहीम राबवूया. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्राचीन अथवा आजही ज्या पद्धतीने जलशुध्दीकरण केले जात होते, त्या पुनः एकदा प्रकाशात आणूया. पुढील पिढीला या पद्धतींची ओळख तर करून देऊया.

जसे पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातील गढुळपणा कमी होतो, पण तळात हा गढुळ भाग साठून रहातो. नंतर गाळून वरील स्वच्छ पाणी वेगळे करता येते.

आपल्याला माहिती असलेली पाणी शुद्धीकरणाची एखादी पारंपारिक स्वदेशी पद्धत सांगा. त्यातील दोष त्रुटी कमतरता शोधून काढू. त्या दूर कशा करता येतील यावर चर्चा करू. मत मांडायला तज्ञच असले पाहिजे असे नाही.

शाळेतदेखील आपल्याला पाणी शुद्ध करायच्या काही कृती शिकवल्या होत्या. शाळा आठवून पहा……

नाहीतर आजी आजोबांना विचारा. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधा. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी, कोणीतरी विचारल्याने त्यांना पण आनंद होईल. आपल्याही मताला आज कुणीतरी तिसरी पिढी विचारणारी आहे, असं त्यांनाही वाटेल.

ज्यांनी आपल्या जीवनातले अनेक चढउतार पाहिलेले आहेत, यशस्वीपणे पार केलेले आहेत, त्यांना ‘या जीवनाच्या’ शुद्धीकरणासाठीचा एखादा पर्याय सहज सुचेल. विचारून तर बघा.
“आजी आजोबा घरातील पाणी कसे शुद्ध करीत होते”…..

घ्या वही पेन, द्या मुलांच्या हातात! सांगा आजीआजोबांची मुलाखत घ्यायला !! करूदेत शब्दबद्ध !!!

जीवनाचा सर्वात मोठा भाग, ज्या ‘जीवनावर’ आहे, त्या अशुद्ध जीवनाकडे इतक्या उदासीनपणे बघून चालणार नाही.
जीवनाचे शुद्धिकरण झालेच पाहिजे!!!

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021

29.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..