सातारा जिल्ह्यातील औंध शहराजवळ आठशे फूट उंचीवर यमाई मातेचं मंदिर वसलेलं आहे. यमाई मातेची मूर्ती ४ भुजांची व ५ फूट उंच असून एका मोठ्या चबुतर्यावर बसवली आहे, काळ्या पाषाणाची ही मूर्ती भव्य स्वरुपाची असल्याने प्रथम दर्शनी तरी मनात भय निर्माण करणारी वाटते, यमाई देवीच्या हातात त्रिशूळ, गदा, बाण आणि पानपत्र ही आयुधे दिसतात; देवीच्या मंदीरात जाण्यासाठी दगडी पायर्या असून, मंदिराच्या भोवती भक्कम व उंच तट बांधलेला दिसतो, व त्याला पाच बुरुज आहेत, मंदिराच्या समोरच साठ फूट उंचीची दिपमाळ असून, औंधचे महाराज १७६ दिवे दिपमाळेत लावत, यमाई देवीला “यमुताई” असंही म्हणण्याची परंपरा आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply