लहान थोरांचे वैज्ञानिक मनोरंजन करणारे यंत्रांमागील विज्ञान यंत्रे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा आता अविभाज्य भाग झाला आहे. आपण सर्व जण यांचा घरोघरी वापर करून आपले जीवन अधिक सुखकारी करीत असतो. परंतु या यंत्रामागील विज्ञानाची आपल्याला अजिबात माहिती नसते. या विविध यंत्रांमागील विज्ञानाची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. श्रीजयंत एरंडे यांनी. पृ. 128 किं. 125 रू. ISBN : 978-93-80232-15-7
नचिकेत प्रकाशन नागपूरने प्रकाशित केलेले लेखक जयंत एरंडे लिखित यंत्रांमागील विज्ञान हे पुस्तक वाचनात आले.
रोजच्या वापरातल्या वस्तू आपण वापरत असतो. परंतु या वस्तूंची आपल्याला साधी माहितीही नसते. स्वयंपाक घरातील फ्रीज कसे काम करतो. तो कोणी बनविला आदी बाबींची रंजक माहिती जयंत एरंडे यांनी या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंबाबतची वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, अशी लेखकाची अपेक्षा दिसून येते.
लेखक जयंत श्रीधर एरंडे यांचा परिचय या पुस्तकात थोडक्यात देण्यात आला आहे. त्यावर नजर टाकल्यास एरंडे यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान लक्षात येते. तसेच त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील माहितीचा सकसपणा दिसून येतो.
या पुस्तकातून त्यांनी वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, रेडीओ, टोस्टर, फॅक्स, झेरॉक्स, हीटर, व्हॅक्युम क्लिनर, टीव्ही, कॉम्प्युटर, पेजर, रिमोट कंट्रोल, टेलिफोन, रडार, विमान, मोबाईल फोन, बॅटरी, चष्मा आदी गोष्टींचा वैज्ञानिक परिचय अत्यंत सोप्या भाषेत करून दिला आहे.
याचबरोबर आकाश निळे का दिसते? ढग काळे कां दिसतात? साखर कशी तयार होते? आग कशी विझवतात? यांची उत्तरे दिली आहेत. उपयुक्त वायूंची दुनिया कशी आहे? पेन्सिल कशी तयार होते? कागद कसा तयार होतो? संगीतातील ध्वनी कसा निर्माण होतो? आदी प्रश्नांची उकलही ते मनोरंजक पद्धतीने व थोडक्यात करून देतात.
थोडक्यात वाचकाला आपल्या भोवती असलेल्या वस्तूंचा वैज्ञानिक दृष्ट्या परिचय करून देण्याचा तसेच वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखक जयंत एरंडे करून देतात. त्यांचा हा छोटासा प्रयत्न फारच उपयुक्त आहे. नचिकेत प्रकाशन, नागपूरने हे पुस्तक प्रकाशित करून लहान मुलांबरोबरच मोठ्यांचेही वैज्ञानिक मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे.
यंत्रांमागील विज्ञान : ले. जयंत एरंडे पाने : १२८ किंमत : १२५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply