यश हे माणसाला सहजासहजी मिळत नसत. आणि म्हणूनच म्हटले आहे, “अपयश हीच यशाची पहिली पायरी होय.” यश हे एक, दोन किंवा तीन प्रयत्नानी मिळते असे कोणीही समजू नये. ते मिळविण्यासाठी प्रयत्न करीत राहणे हाच त्यावरील उपाय होय. ह्यासाठी “थेंबे थेंबे तळे साचे” ही म्हण संयुक्तिक ठरावी. आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणे हा यावरील एकमेव योग्य आणि महत्वाचा उपाय होय. आपल्या जीवनाचे एकच ध्येय असावयास हवे आणि ते म्हणजे “कोणताही प्रयत्न मी सोडून देणार नाही.” त्याचबरोबर आपल्या मनात असणारी अपयशाबद्दलची, पराभवाची, यश मिळणार नाही याबद्दलची भीती पार काढून टाकावयास हवी.
विक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो आणि आपणास एक ग्राहक मिळतो. हे जरी खरे असले, तरी ह्याचा अर्थ असा नव्हे की एक खडा लागणारच. कदाचित तो लागनारही नाही आणि आपली विक्री होणारही नाही. याचा अर्थ असा तर नव्हे की आपण आपले प्रयत्न सोडून द्यावेत. आणि म्हणूनच आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवावयास हवेत. काय सांगावे, अशाप्रकारे एका छान अशा सुंदर सकाळी आपणाला आपले यश मिळाल्याचे दिसून येईल. ह्यासाठीच म्हटले आहे, “कर्तृत्वानेच मिळव यश……..विश्वासान जीवनात कर यशाला वश…………पक्का ठेव तू तुझ्या मनाचा विश्वास……..फक्त विजयाचा मनात धर तू ध्यास……….विजय तुझाच असेल!!!
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply