नवीन लेखन...

यशाचा सिद्धांत……..!!!

स्वप्ने, ज्यामध्ये इच्छा प्रगट होत असतात किंवा उत्पन्न केल्या जातात, मार्गक्रमणा करण्यासाठी मार्गाचा किंवा दिशेचा अवलंब केला जातो आणि नंतर त्या पूर्ण करता येतात, अशांचा समावेश होत असतो.

कांही व्यक्ति अशा असतात की त्यांना चांगले जीवन जगण्याची इच्छा तर असते, परंतू त्या जोखीम घेण्यास असमर्थ असतात

किंवा त्या जोखीम घेतच नाहीत किंवा त्या जोखीम घेण्यास कचरतात. परंतू अशावेळी जर का आपण वरील सिद्धांत अनुसरला, तर आपण आपल्या भावी यशस्वी आयुष्याची सुरुवात करू शकू. काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्यासाठी माणसाला स्वप्ने पाहणे फार गरजेचे असते. ज्यामुळे स्वप्ने इच्छेला प्रगत करतील, इच्छा मग दिशा घेईल व त्यामुळे स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यास मदतच होईल. दिशा निर्माण केल्यानन्तर एकाद्याने त्यासाठी कार्याला वाहून घ्यावयास हवे. तसे केल्याने स्वप्ने साकारतील.

सदा-न-कदा मोठी जोखीम जी आपण घेत असतो ती म्हणजे तीच तीच गोष्ट त्याच किंवा नेहमीच्याच पद्धतीने करणे आणि त्यापासून मिळणा-या गोष्टींमध्येच अडकून राहणे. परंतू खरे पहिले तर ही जोखीम घेणे फायद्याचे सिद्ध होत नाही. ही जोखीम नसून रोजचा आपला परिपाट झाला.

जोखीम अशी घ्यावी जी खरोखरीच आपल्याला यशाकडे घेवून जाईल. मग अशी जोखीम ती कोणती? तर अशी जोखीम ती की जी आपला रोजचा वहिवाटीचा मार्ग न अनुसरता एका वेगळ्याच मार्गाने घेवून जाईल, काहीतरी नविन करावयास भाग पाडेल. अशक्याला शक्य करेल. भीतीला मागे सारून जोखीम घेण्यास आपणास भाग पाडेल. आपणास सर्वस्व झोकून देण्यास सिद्ध करेल. विचारांचे उठलेले वादळ शांत करेल आणि न पाहिलेल्या मार्गावर आपणास जावावयास उद्युक्त करेल.

तरी वरील सिद्धांतांचा अवलंब करा व पहा आपण आपले आयुष्य कसे बदलते ते ?

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..