Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात,
रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!!
तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त,
जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!!
संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी,
कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!!
अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले,
आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी चिंब न्हाले!!
पुरे झाले कष्ट पप्पा, निवृत्तीची वेळ आली,
निवृत्ती नव्हे हो ही, जगण्याची नवी आवृत्ती आली!!
इंद्रधनुचे सप्तरंग, तुमच्यासमोर ते नग्ण्य,
तुमच्या या यशकिर्तीने जन्मदात्रीची कुसही झाली धन्य!!
– श्र्वेता काशिनाथ संकपाळ.