सोसे दुख सांगू न्हाई
झाडापरी व्हावं मुकं
दयाव घ्यावं वला शबूद
ऐकू न्हाई कदी कौतुक
जगू दे रे मनाठायी
फळं फुलं ओलं सुकं
पडे पदरात जे काही
मान हेच सार सुख
साचून का डबके होई
दे कि सोडुन सारं
खळखळ वाहे सरितामाई
फुलवं अंगातील वावरं
मुखी वाणी कशापायी
इचार करिशी थांबून
वाया नगं रं आटापिटा
कर्म येतीचं परतून
तुज माज काही न्हाई
तोड मव्हाचे द्वार
मुखी नाम जो जो घेई
त्याचा सुटे येरझार!!
— वर्षा कदम.
Leave a Reply