येशील तू कधी भेटाया सख्या
ती वाट मी अलगद पाहते
गंध अत्तरी केवड्याचे सभोवती
सुवास दरवळून आल्हाद वाहे
ती कातर वेळ संध्या समयी
केशरात सांज अलगद भिजे
संध्या छायेचा खेळ मनोहर
सांज केशरी सूर्य साक्षी असे
ये सख्या नभ शामल वेळी
ती वेळ धुंद क्षण बावरे
तुझा स्पर्श मधाळ मोहून
मिठीत तुझ्या मी गंधाळते
घे तू चुंबून अलवार मज
आस मलमली तुझी बहरे
आहेस पुरुष तू अन स्त्री मी
न प्रश्न अधिक पडावे कुठले
ओढता मिठीत मज हलकेच
मोगऱ्याचे गंध हलकेच दरवळे
ये सख्या तू अवचित असा
ही रातराणी साद देते तुज रे
घे मिठीत अलवार तू मज
ओठ ओठांनी चुंबीता तू रे
चंद्र पाहिलं हसून हा प्रणय सारा
चांदण्यात तृप्त होईल तुझ्यासवे मी रे
कितीक वाट पाहू तुझी
ये सख्या काहूर तुझे मनी दाटले
भिजले मन हळवे तुझ्या आठवणीत
तुझ्या वाटेवर चांदण टिपूर सजले
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply